आगामी दशकांत धर्मावर आधारित लोकसंख्येत मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. जगातील विविध धर्माच्या लोकसंख्येची चक्रावून टाकणारी माहिती समोर आलीये. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालात इस्लाम धर्माबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आलाय. 2035 पर्यंत ख्रिस्ती धर्माला मागे टाकून इस्लाम जगातील सर्वात मोठा धर्म बनू शकतो, असा अंदाज प्यू रिसर्च सेंटरमध्ये वर्तवण्यात आलाय.
सध्या जगात 2 अब्ज 27 कोटी ख्रिश्चन आणि 2 अब्ज 2 कोटी मुस्लीम आहेत. मात्र, 2035 पर्यंत मुस्लिमांची लोकसंख्या वाढून 2 अब्ज 57 कोटी तर ख्रिश्चनांची लोकसंख्या 2 अब्ज 52 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. 2070 पर्यंत जगातील मुस्लिमांची लोकसंख्या 3 अब्ज 60 कोटींपेक्षा जास्त होऊ शकते. तर ख्रिश्चनांची लोकसंख्या 3 अब्जांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
महत्त्वाचं म्हणजे, मुस्लिम धर्मियांच्या लोकसंख्या वाढीमागचं प्रमुख कारण जन्मदर आहे. मुस्लिम महिलांचा सरासरी प्रजनन दर 3.1 इतका आहे. त्यामुळे 2070मध्ये भारतात मुस्लिम लोकसंख्येचं चित्र नेमकं कसं असेल ते पाहुयात...
हिंदूंच्या तुलनेत मुस्लीम वाढणार?
2027 पर्यंत भारतात हिंदू बहुसंख्यकच राहतील, मात्र लोकसंख्या वाढीचा वेग मंदावण्याचा अंदाज आहे
लोकसंख्येत मुस्लीम धर्मियांचं प्रमाण वाढून 20 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतं
तर हिंदूंची लोकसंख्या 79 टक्क्यांवरून 76 टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज
2070मध्ये भारतात हिंदू लोकसंख्या सुमारे 128 कोटी तर मुस्लीम लोकसंख्या 33 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज
NFHS-5 नुसार भारतात मुस्लीम महिलांचा प्रजनन दर 2.36 आणि हिंदू महिलांचा 1.94
2.1 दर हा लोकसंख्या स्थैर्यासाठी योग्य मानला जातो
2020-2070 या पन्नास वर्षांत भारतात हिंदू लोकसंख्येत 17 कोटी 60 लाखांची भर पडण्याचा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आलाय.
एव्हंढच नव्हे तर कोणत्याही धर्मियांची संख्या धर्मांतरामुळे वाढत नाही. तर त्या धर्मात जन्माला येणाऱ्या मुलांमुळे वाढते, असा उल्लेख प्यू्च्या अहवालात आहे. प्रजनन दरातील फरकामुळे 2070 पर्यंत भारतासह जगात मुस्लिम लोकसंख्या वाढण्याचा अंदाज आहे. मात्र, हिंदू लोकसंख्या वाढणार असली तरी तिच्या वाढीचा वेग घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.