Bangladesh : दसरा उत्सवादरम्यान इस्कॉन मंदिराची तोडफोड आणि हिंदू भाविकांवर 'हिंसक हल्ला'! Twitter @iskcon
देश विदेश

Bangladesh : दसरा उत्सवादरम्यान इस्कॉन मंदिराची तोडफोड आणि हिंदू भाविकांवर 'हिंसक हल्ला'!

बांगलादेशातील येथील इस्कॉन मंदिरातील भक्तांवर जमावाने हिंसक हल्ला केला, या दरम्यान अनेक भाविक जखमी झाले आणि मंदिराच्या मालमत्तेचे नुकसान झाले!

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

बांगलादेश : बांगलादेशमध्ये हिंसाचार आणि हिंदू मंदिरांवर आणि भक्तांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये धार्मिक दंगलींची परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशात दुर्गा पूजेच्या उत्सवाच्या वेळी मंदिर आणि मूर्तींची तोडफोड केल्याच्या काही दिवसांनी, दसऱ्याच्या दिवशी असाच दुसरा हल्ला झाला आहे.

नोआखली भागातील इस्कॉन मंदिरातील भक्तांवर जमावाने हिंसक हल्ला केला, या दरम्यान अनेक भाविक जखमी झाले आणि मंदिराच्या मालमत्तेचे नुकसान झाले. तोडफोड केलेल्या मंदिराची छायाचित्रे ट्विटरच्या माध्यमातून शेअर करताना इस्कॉनने म्हटले आहे की, मंदिराच्या मालमत्तेचे लक्षणीय नुकसान झाले आहे आणि एका भक्तावर, ज्यावर खंजीरने हल्ला झाला होता, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

इस्कॉनचे संस्थापक ए.सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद यांच्या मूर्तीची देखील या गुंडांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मंदिर प्राधिकरणाने बांगलादेश सरकारला आवाहन केले आहे की सर्व हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करा आणि गुन्हेगारांना न्याय द्या.

हे देखील पहा :

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सांप्रदायिक हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरही हिंसाचार घडला. गुरुवारी देशातील हबीगंज जिल्ह्यातील दुर्गा पूजा स्थळावर मदरसा विद्यार्थी आणि हिंदू यांच्यात झालेल्या चकमकीत एका पोलिसासह 20 हून अधिक लोक जखमी झाले.

इस्कॉनच्या अधिकाऱ्यांची भारताकडे हस्तक्षेपाची मागणी

इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधरमण दास यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की त्यांनी या प्रकरणावर त्यांच्या बांगलादेशी समकक्षांशी त्वरित बोलावे. 'सेव्ह बांगलादेशी हिंदू' हॅशटॅगसह एक ट्वीट पोस्ट करत दास म्हणाले की शेजारच्या देशात हिंदूंविरुद्ध व्यापक हिंसाचार सुरू आहे.

नोआखली येथील इस्कॉन मंदिराबाहेर जमलेल्या 500 लोकांच्या जमावाने, मूर्तींची तोडफोड आणि मंदिराला आग लावल्याचा दावा दास यांनी केला.

बांगलादेशात धार्मिक हिंसाचार उफाळला

एक दिवस आधी, बांगलादेशात दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान हिंसाचार उसळला होता. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवरुन, नानुवार दिघी येथील काठी उत्सवादरम्यान पवित्र कुराणची विटंबना करण्यात आल्याची चर्चा पसरली. कुमिलिया जिल्ह्यातील ननुआ दिघीरपार भागात कट्टरपंथीयांचा पोलिसांशी संघर्ष झाला तेव्हा तीन लोकांचा मृत्यू झाला आणि कमीतकमी 50 जखमी झाले.

वाढत्या हिंसाचारादरम्यान, खुलना जिल्ह्यातील एका हिंदू मंदिराच्या गेटमधून कमीतकमी 18 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले, ज्यामुळे देशातील हिंदू समाजाच्या सुरक्षेवर चिंता निर्माण झाली.

हिंदू समुदायावर हल्ले होत असताना, बांगलादेशी सरकारने सर्व गैरप्रकार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. याव्यतिरिक्त, सुरक्षा वाढवण्यासाठी बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) जवानांना किमान 22 जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact-Check: रक्षाबंधनाला शेतकऱ्यांना 4 हजार रूपये? केंद्र सरकार शेतकऱ्यांना वाढीव 2 हजार देणार?

Gold Prices: सोनं का महागतंय? सोनं 3 लाखांच्या पार जाणार?

मुंबईच्या चाळीतील ७ खेळाडूंचा भूतानमध्ये कहर; दक्षिण आशियाई बॉक्स-लंगडी चॅम्पियनशिपमध्ये जिंकली सुवर्णपदकं

सर्वसामान्यांना महागाईचा झटका, सणासुदीत साखर कडू, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ

Eng vs Pak Highlights : इंग्लंडनं पाकिस्तानला दिला ८ वर्षांनंतर जबरा झटका; एक डाव आणि १०३ धावांनी उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT