अमेरिकेने इराणच्या आण्विक तळावर हल्ला केल्यानंतर आता इराणने जगाचंच नाक दाबलंय. जगभरातील व्यापारासाठी महत्वाच्या असलेल्या होर्मुझ खाडी बंद कऱण्यास इराणच्या कायदेमंडळाने मंजूरी दिलीय. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगात इंधनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झालीय.मात्र ही होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्वाची का आहे? पाहूयात.
इराणच्या दक्षिणेला तर ओमान आणि युएईच्या उत्तरेला होर्मुझची सामुद्रधुनी
होर्मुझची सामुद्रधुनी इराणचं आखात आणि अरबी समुद्राला जोडते
इराक, इराण, कतार, बहरीन, सौदी अरेबिया, जॉर्जन, कुवेतसाठी मुख्य व्यापारी मार्ग
होर्मुझ सामुद्रध्वनीतून आखाती देशांमधील 90 टक्के तेल, नैसर्गिक वायूची निर्यात
होर्मुझ खाडीमार्गे भारतात 60-65 टक्के कच्चं तेल आयात
चीन, अमेरिका, जपानसह जगभरात कच्चं तेल निर्यातीचा मार्ग
इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं त्याचा जगावर कसा परिणाम होणार? ते पाहूया.
जगभरात कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या साखळीवर परिणाम होणार
कतारमधून होणाऱ्या एलएनजी नैसर्गिक वायूच्या निर्यातीवर परिणाम होणार
होर्मुझ खाडी बंदीमुळे कच्च्या तेलाची किंमत 75 डॉलर प्रति बॅरल वरुन 120 डॉलर प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता
होर्मुझ खाडी बंद केल्याने जगात उर्जासंकट येण्याची शक्यता
खरंतर 167 किलोमीटर लांब आणि 33 किलोमीटर रुंद असलेल्या होर्मुझच्या खाडीची नाकेबंदी केल्याने जगावर मोठं आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे.. यामध्ये अमेरिका, चीनसह भारतालाही फटका बसण्याची भीती वर्तवली जातेय.. मात्र हा अंदाज पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींनी फेटाळून लावलाय.
इस्त्रायल पॅलेस्टाईन युद्धानंतर भारताने रशिया आणि अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली... मात्र रशियाकडून सर्वाधिक कच्चं तेल काळा समुद्र, बाल्टिक समुद्रामार्गे होर्मुझची खाडी किंवा भुमध्य समुद्रातून आयात केलं जातं. मात्र भुमध्य समुद्रातून कच्चं तेल आयात केल्यास त्याच्या किंमती वाढून देशात महागाईचा भडका होणार हे निश्चित.. त्यामुळे इराणच्या निर्बंधातून सूट मिळवण्यात भारताला यश मिळणार का? याकडे लक्ष लागलंय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.