Iran US conflict latest news Saam TV Marathi
देश विदेश

Iran US war ceasefire : युद्धखोर अमेरिकेची इराणनं जिरवली, ट्रम्प यांची धमकी हवेत विरली?

Iran US ceasefire 15 days conditions explained : ४० दिवस चाललेल्या इराण-अमेरिका संघर्षानंतर १५ दिवसांची युद्धबंदी जाहीर. इराणने अमेरिकेसमोर कठोर अटी ठेवल्याने जागतिक राजकारणात नवा ट्विस्ट. सविस्तर बातमी वाचा.

Namdeo Kumbhar

रोहित कदम

Iran US conflict latest news : तब्बल 40 दिवस चाललेल्या इराण-अमेरिका युध्दात आता नवा ट्विस्ट आलायं. इराण- अमेरिका संघर्ष आता 15 दिवसांसाठी थांबणार आहे... मात्र युद्धबंदीआधी इराणनं अमेरिकेला युद्धात कसं गुडघ्यावर आणलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

इराणविरोधात युद्ध छेडून महासत्तेच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टागणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची इराणनं चांगलीच खिल्ली उडवलीय......इराणी सैनिकापुढे ट्रम्प यांनी अक्षरशा गुडघे टेकल्याचा फोटो इराणी दूतावासाने पोस्ट केलाय..आणि याला कारण ठरलयं....इराणला बेचिराख करू, अशी धमकी देणाऱ्या ट्रम्प यांची युद्धबंदीची घोषणा...अखेर 40 दिवसांनंतर इराण- अमेरिका संघर्ष 15 दिवसासाठी थांबणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं... आणि इराणनं अमेरिकेची खिल्ली उडवत युद्धाच्या चाव्या मिळाल्याचा टोला थेट ट्रम्प यांना लगावला...

इराणच्या या पोस्टनंतर इराणी ख्वारिझमचा राजा सुलतान मोहम्मद आणि चंगेझ खानमधील संघर्षाची आठवण झालीय...व्यापारी करारासाठी चंगेझ खाननं पाठवलेल्या एका दूताचा सुलतान मोहम्मदनं शिरच्छेद करून अनेक वर्षांपूर्वीच इराण कधीच कुणापुढे झुकणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं... मात्र त्यानंतरच्या संघर्षात सुलतान मोहम्मदचा बलाढ्य चंगेझ खाननं पराभव केला... आणि सत्तास्थापना केली... मात्र कधीच कुणापुढे झुकणार नाही, ही इराणी राजाची भूमिका आजही इराणी सत्ताधाऱ्यांनी कायम ठेवली... त्यामुळे या संघर्षातही इराणनं युद्धबंदीसाठी 10 अटी ठेवत अमेरिकेचीच कोंडी केल्याचं पाहायला मिळालं...

इराणच्या अमेरिकेसमोर 10 अटी

- इराणवरील हल्ले तातडीनं थांबवा

- अमेरिका-इस्रायल कुठलाही लष्करी हल्ला करणार नाही..

- होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहणार

- युरेनियम संवर्धनास परवानगी द्यावी

- सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध हटवावेत

- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व निर्बंध रद्द करा

- आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सर्व ठराव मागे घ्यावेत

- इराणला नुकसान भरपाई द्यावी

- पश्चिम आशियातील अमेरिकेचं सैन्य मागे घ्यावं

- लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्ष थांबवावा

खरंतर इराणवर हल्ले करून युद्धखोर अमेरिकेनं संपूर्ण जगावर युद्ध लादलं. मात्र या युद्धातून अमेरिकेला काहीच हाती लागलं नाही...उलट 40 दिवसांनंतर महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेवर पाकिस्तानच्या मध्यस्थीनं युद्ध थांबवण्याची नामुष्की ओढावलीय...आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर शरणागती पत्करली असली तरी ट्रम्प यांच्या याआधीच्या मनमानी कारभाराप्रमाणे ही युद्धबंदी अल्पकाळासाठी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT