IRAN BLOCKING STRAIT OF HORMUZ? $18 CRORE TOLL CLAIM SPARKS GLOBAL CONCERN saam tv
देश विदेश

होर्मुझवरून इराण करतंय जगाची नाकेबंदी? एका जहाजासाठी 18 कोटींचा टोल?

Strait of Hormuz Tensions Rise: जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ जलमार्गावरून इराणनं नवी रणनीती आखलीये. होर्मुझवरून इराणनं टाकलेला डाव आता जगाची कशी नाकेबंदी करणारेय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • होर्मुझ सामुद्रधुनी जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची

  • इराणकडून टोल आकारण्याच्या दाव्यामुळे खळबळ

  • जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या थायलंडच्या मयुरी नारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला करून इराणनं जगाला धडकी भरवली होती. आणि संपूर्ण जगावर इंधन टंचाईचं सावट पसरलं. आता अमेरिकेसोबतच्या चर्चेस नकार दिल्यानंतर इराणनं होर्मुझवरील आपली पकड आणखी मजबूत केलीय. होर्मुझ जलमार्गात अडकलेल्या जहाजांना मार्ग उपलब्ध करून देतानाच होर्मुझमध्ये आपली मक्तेदारी निर्माण करण्यासाठी इराणनं नवी रणनीती आखलीय.

इराणनं होर्मुझ जलमार्ग सुरक्षित करण्यासाठी अडकलेल्या जहाजांकडून टोल आकारला जाईल.

प्रत्येक जहाजांकडून 20 लाख डॉलर्स म्हणजेच 18 कोटी टोल आकारणार. एका इराणी वृत्तपत्राच्या दाव्यानुसार दोन तेलवाहू जहाजांनी युआन या चिनी चलनाचा वापर करत टोल भरलाय.इराणनं या सामुद्रधुनीचा वापर करण्यासाठी आतापर्यंत फक्त 6 देशांना मुभा दिलीये.

यात भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तान या देशांना होर्मुझ जलमार्ग वापरण्याची याआधीच मुभा दिलीये. अशातच आता मलेशियालाही परवानगी देत इराणनं इतर देशांच्या जहाजांवर मात्र टोल आकारण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे पश्चिम आशियातील या युध्दात आता होर्मुझची सामुद्रधुनी महत्वाची ठरत आहे.अमेरिकेच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत इराणनं अमेरिकेसह इतर देशांची नाकेबंदी करण्यास सुरूवात केलीय. अमेरिकाविरोधातल्या इराणच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता युध्द कोणत्या दिशेने जाणार याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constipation: सकाळी 1 मिनिटांत पोट होईल साफ, फक्त फॉलो करा ही सोपी पद्धत

Electricity Bill: महाराष्ट्रात वीज स्वस्त, १० ते १४ टक्क्यांनी कपात; प्रति युनिटमागे किती रूपये द्यावे लागणार?

अहो काय सांगता! पेट्रोल पंपावर दारू मिळणार, काय आहे व्हायरल सत्य?

Maharashtra Live News Update: निवासी शिक्षण केंद्रासाठी पालिकेकडून १ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर

Maharashtra Weather : राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; आजचे हवामान कसे असेल? वाचा

SCROLL FOR NEXT