F15E Fighter Jet Down News google
देश विदेश

Iran US War: इराणनं पाडले अमेरिकेचे 2 फायटर जेट? युद्धात अमेरिकेसाठी 'ब्लॅक फ्रायडे'

Fighter Jet Down: आखाती युद्धात आता इराणनं अमेरिकेला हवेतच हादरा दिलाय. अमेरिकेची 2 फायटर जेट पाडून इराणनं अमेरिकेची कशी हवा काढली, आणि युद्धात अमेरिकेसाठी 3 एप्रिलचा दिवस ब्लॅक फ्रायडे कसा ठरला. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता विनाशाच्या वळणावर पोहोचलय... 3 एप्रिलचा दिवस अमेरिकेसाठी काळरात्र ठरलाय..कारण अमेरिकेची अभेद्य मानली जाणारी हवाई सुरक्षा यंत्रणा इराणच्या हल्ल्यात उद्धवस्त झालीय...इराण- अमेरिकेच्या बॅटल ऑफ स्कायमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात...

इराणनं अमेरिकेचे F-15E स्ट्राईक ईगल हे लढाऊ विमान हल्ल्यात पाडलं...या लढाऊ विमानातील एका वैमानिकाला रेस्क्यु करण्यात आलं तर दुसरा वैमानिक इराणमध्ये लपल्याची माहिती आहे... त्यामुळे अमेरिकेनं वैमानिकाच्या बचावासाठी HH-60W जॉली ग्रीन हे 2 हेलिकॉप्टर पाठवले होते...मात्र त्या हेलिकॉप्टरवरही इराणनं गोळीबार केलाय.. ज्यात काही जण जखमी झालेत... तसचं इराणच्या कोहगिलुयेह, बोयर-अहमद प्रांतात अमेरिकी विमान पाडल्याचं समोर येतयं...त्याशिवाय इराणच्या हल्ल्यानंतर A-10 वॉर्थोग विमान पर्शियन आखातात कोसळलं... तसचं 24 तासांत अमेरिकेच्या 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरवरही इराणनं हल्ले केलेत.

दरम्यान आयआरजीसीनं हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या अमेरिकेनं वैमानिकाच्या शोधासाठी मोहिम सुरु केलीय..इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी या घटनेचं वर्णन युद्धातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून केलयं... तर शत्रूच्या वैमानिकाला पकडण्यासाठी इराणी सरकारनं नागरिकांना आवाहन करून मोठं बक्षीसही जाहीर केलयं.

त्यामुळे अमेरिकन सैनिक इराणच्या हाती लागल्यास युद्धाला वेगळचं वळण मिळणार हे नक्की... मात्र 28 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या युद्धात अमेरिकेचं पहिल्यांदाच इतकं मोठं नुकसान झालयं... त्यामुळे इराणी सैन्याचं मनोबल वाढलं असून अमेरिकेची चांगलीच नाचक्की झालीय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

SCROLL FOR NEXT