Iran Qatar conflict x
देश विदेश

जगात गॅस वॉर! इराणचा कतारच्या LNG प्रकल्पावर हल्ला; भारताचं टेंशन वाढणार

इराणनं कतारवर केलेल्या हल्ल्यानंतर जगात गॅस वॉर सुरु होणार असल्याची चिन्ह आहे... मात्र जग गॅस वॉरमध्ये होरपळं गेलं तर भारतावर त्याचा कसा परिणाम होणार? भारतीयांची युद्धात कशी कोंडी होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

इराण- इस्रायल युद्ध आता गॅस वॉरच्या दिशेने निघालयं.....इस्रायलनं साऊथ पार्सवर केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणनं कतारमधील LNG चा सर्वात मोठ्या प्रकल्पावर हल्ला चढवला...या हल्ल्यात हा प्रकल्प उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जातय. यामुळे मात्र भारताचं टेंशन चांगलंच वाढलंय. कारण याचा थेट परिणाम भारताच्या एलएनजी पुरवठ्यावर होणार आहे...भारत कोणत्या देशातून किती एलएनजी आयात करतो पाहूयात...

भारताला जेवढी गरज आहे त्यातील 50 टक्के नैसर्गिक गॅस भारत आयात करतो...यात आखाती देशांतून सर्वाधिक गॅसची आयात केली जाते...भारत कतारमधून 42.2 टक्के, अमेरिकेकडून 18.5 टक्के तर UAE मधून 11.11 टक्के, अंगोलामधून 7.07 टक्के गॅस आयात करतो...

भारताने नुकताचं कतार एनर्जीसोबत दरवर्षी 7.5 दशलक्ष टन एलएनजी आयात करण्यासाठी 20 वर्षांच्या कराराचं नूतनीकरण केलंय.. ज्याची किंमत अंदाजे 78 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. त्यात इराणनं कतारमधील एलएनजी प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यामुळे भारतावर काय परिणाम होणार पाहूयात...

भारत दरवर्षी २७ मिलियन टन एलएनजीची आयात करतो. यातील १२ ते १३ मिलियन टन एलएनजी कतारहून येतो. त्यामुळे कतारमधील हल्ल्यानंतर तिथे उत्पादन कमी झाल्यास भारताला LNGच्या टंचाईची झळ बसेल...त्यामुळे भारताला इतर देशांमधून महागडा LNG विकत घ्यावा लागू शकतो.

भारतात LNG चा कुठे कुठे वापर होतो पाहूयात...

LNGचा वापर कुठे?

ऊर्जा प्रकल्पांमध्ये विजेच्या निर्मितीसाठी वापर

काच, सिरॅमिक आणि अन्न प्रक्रिया उद्योगांमधील मशिनरीसाठी महत्त्वाचं इंधन

लांब पल्ल्याची अवजड वाहनं आणि मोठ्या जहाजांसाठी डिझेलला पर्यायी इंधन

स्वयंपाकासाठी आणि रूम हिटर म्हणून खोल्यांमधील तापमान वाढवण्यासाठी

फर्टिलायझर, औषधं आणि प्लास्टिकच्या कारखान्यांमध्ये मोठा वापर

त्यामुळे या उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हे कारखाने बंद पडले तर बेरोजगारीचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्ह आहेत. आधीच होर्मुज जलमार्ग बंद केल्यामुळे कच्च्या तेलाचे दर १२० डॉलरवर गेले आहेत. हे गॅस वॉर असंच सुरू राहिल्यास हे दर २०० डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : करिअर जोरात असणार, नोकरीत पगारवाढ मिळणार; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

महाकाय दीडशे फुटांची गुढी, गुढीपाडव्याला कोणत्या जिल्ह्यात काय आकर्षण ठरलं?

तू मला हात का लावला? कल्याणमध्ये KDMC च्या गेटवर तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Raj Thackeray : शाळा-कॉलेजात ड्रग्ज पोहोचलं, लहान मुलं पळवली जात आहेत; गृहमंत्री काय करतायत? राज ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांची सर्वात मोठी घोषणा, VIDEO

SCROLL FOR NEXT