Iran Iran Jihad against US 
देश विदेश

अमेरिकेविरोधात इराणचा जिहाद; आखाती देशांविरोधात 'कोड 009' मिशन

Iran Iran Jihad against US : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अमेरिकेविरोधात इराण कमालीचा आक्रमक झाला आहे. इराणनं आखाती देशांविरोधात मिशन 'कोड 009' सुरू केलंय. काय आहे हे मिशन. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. इराणनं मिशन 'कोड 009' अंतर्गत आखाती देशांवर भीषण हल्ले सुरू केलेत. माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनं अमेरिकी सैन्य तळ असलेल्या 9 अरब देशांना लक्ष्य केलंय.

अमेरिकेनेही तेहरानसह इराणच्या 12 शहरांवर क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला केल्यामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये कमालीची दहशत निर्माण झालीय. सोमवारी इराणवर दुसऱ्यांदा हल्ला झाला. इराणच्या बंदर अब्बास आणि केशम बंदराजवळ पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकू आले.

इराणचं मिशन 'कोड 009'

इराणचे माजी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामेनींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मोहीम

9 जुलैला खामेनींवर अंत्यसंस्कार, त्यावरूनच मोहिमेला 'कोड 009' हे नाव दिलं

मोहिमेत अमेरिकेची लष्करी तळं असलेल्या 9 अरब देश लक्ष्य

कतार, यूएई आणि बहरीनमधील अमेरिकी कमांड सेंटर्सवर क्षेपणास्त्र

इराणच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यांमुळे संपूर्ण अरब देशात प्रचंड दहशत

इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी आपल्या पहिल्या जाहीर भाषणात, अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली. "शहीद नेत्याच्या रक्ताचा बदला कोणत्याही परिस्थितीत घेतला जाईल." या त्यांच्या वक्तव्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. अयातुल्ला खामेनी यांच्यावर त्यांच्या निधनानंतर तब्बल चार महिन्यांनी ९ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ३ ते ९ जुलै दरम्यान तेहरान, कोम आणि त्यांच्या जन्मगावी मशहद येथे भव्य अंत्ययात्रा काढण्यात आल्या. त्यानंतर इराण अमेरीकेविरोधात पुन्हा आक्रमक झाला आहे.

अमेरिका आणि इस्त्राईलने 28 फेबुवारीला इराणवर पहिला हल्ला केला. इराण आणि शत्रू राष्ट्रांमधील थेट युद्ध साधारणपणे 108 दिवस चालले होते. ही लष्करी कारवाई 14 जून 2026 रोजी शांतता करारानंतर थांबली होती. जून 2026 च्या मध्यावर युद्धविराम झाला असला तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 जुलै 2026 च्या सुमारास हा युद्धविराम संपल्याची घोषणा केली. सध्या होर्मूझचा जलमार्ग बंद असल्याने जगाची तेल कोंडी झाली आहे. महायुद्ध जगाला विनाशाच्या खाईत लोटणारं आहे. त्यामुळे इराणची बदला घेण्याची भूमिका बदलणार का? आखातात शांतता नांदणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT