Iran Israel Saam tv
देश विदेश

Iran Israel Conflict : इराणचं स्वप्न अमेरिकेनं केलं बेचिराख; अमेरिकन बॉम्बर बनले यमदूत, वाचा स्पेशल रिपोर्ट

Iran Israel Conflict update : रविवारच्या मध्यरात्री इराणचं स्वप्न अमेरिकेनं मातीत मिसळलं. एकाच वेळी 3 साडे तीन हजार किलोमीटरहून आलेल्या विमानांनी इराणच्या अनेक वर्षांच्या मेहनतीवर आग ओकली आणि इराणचं शेकडो कोटींचे नुकसान तर झालंच परंतू यामुळे जगातील वातावरण कमालीचं तापलं. पाहूया..

Snehil Shivaji

जग जेव्हा शांत झोपलं होतं तेव्हा मध्यरात्री सुर्या इतका लख्खं प्रकाश अचानक इराणमध्ये पडला. हा प्रकाश होता B-2 स्टेल्थ बॉम्बरचा आणि याच प्रकाशात इराणचं अण्वस्त्र सज्जतेचं स्वप्न भस्मसात झालं. रविवारी मध्य रात्री इराणचा अणू सज्जतेचा कार्यक्रम अमेरीकेनं संपवला. अनेक इशारे देऊनही इराण जुमानत नसल्यानं इस्रायल आणि इराणच्या युद्धात अखेर अमेरिकेनं आपल्या मित्रासाठी इराणवर हल्ला केला.

इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान अण्वस्त्र केंद्रांवर तुफान हल्ला चढवला. सहा मोठे बंकर बस्टर बॉम्ब आणि ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी इराणच्या अण्वस्त्र स्वप्नांना भुईसपाट केलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अमेरिका आणि इराणमधील अंतर हे 10 ते 12 हजार किलोमीटर मग इतक्या दूरुन अमेरिकेनं इराणवर हल्ला केला कसा तर पाहा..

दिएगो गार्सियातून इराणवर हल्ला

हिंद महासागरातील महत्वाचं लष्करी तळ

1970 पासून अमेरिकेचं हवाई आणि नौदल तैनात

ब्रिटनच्या मालकीचं पण अमेरिकेचं नियंत्रण

इराणपासून सुमारे 3,800 किमी दूर

इराण इस्रायलच्या युद्धात इराणनं इस्रायलला सडेतोड उत्तर देत जेरीस आणलं. यावेळी युद्ध थांबवण्याचे निर्देश अमेरिकेनं इराणला दिल्यानंतर इराणनं या निर्देशांना हवेतच उडवून लावलं आणि हे युद्ध सुरुच ठेवलं. अमेरिकेनं यानंतर इराणच्या थेट 3 मुख्य भागांवर हल्ले करुन इराणला आपली ताकद दाखवून दिली. यावेळी फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर B-2 स्टेल्थ बॉम्बर डागून ही ठिकाणं नेस्तानाबूत केली. B-2 स्टेल्थ बॉम्बर हे इराणवर अक्षरक्ष काळाचा घाला म्हणूनच कोसळले याच बॉम्बरची खासियत काय पाहूया..

इंधन न भरता 9 हजार 600 किमी प्रवासाची क्षमता

हवेत इंधन भरुन 30 हजार किमीपर्यंतचा प्रवास

अखंड 37 तास प्रवासाची क्षमता

भुमिगत बंकर बस्टर बॉम्बची क्षमता

रडारला चकवणारं स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त

लहान पक्ष्याएवढी रडार छाया

18 टनांपर्यंत बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता

अमेरिकेच्या ताफ्यात सध्या अवघे वीस इतकेच B-2 स्टेल्थ बॉम्बर आहेत. 16 हजार 700 कोटींचे हे बॉम्बर अमेरिकेनं इराण विरोधात का वापरलं असा प्रश्न जगाला पडला त्याला कारणही तसंच आहे. कारण इराणचं फोर्डो हे अणुउर्जेचं सर्वात खोल आणि सुरक्षित केंद्र मानलं जात होतं कारण ते डोंगराच्या खोल भूगर्भात 300 फूट खोल होतं. आणि ते नेस्तानाबूत करण्यासाठीच अमेरिकेनं B-2स्टेल्थ बॉम्बर वापरून जगात अण्वस्त्र कार्यक्रम हा फक्त आणि फक्त आमच्याच संमतीनं होईल हे दाखवून दिलंय. अमेरिकेने केवळ बंकर फोडले नाहीत, तर इराणच्या अणुशक्तीवरचं स्वप्नंही फोडून टाकलं! त्यामुळे अगर दुश्मन नीचे छिपा हो... तो आसमान से जवाब आएगा!" असंच पाहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT