Intelligence Bureau Recruitment Saam Tv
देश विदेश

Intelligence Bureau Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 पदांसाठी भरती, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Recruitment News: केंद्रीय गृह मंत्रालयाने इंटेलिजेंस ब्युरो ACIO, JIO, SA आणि इतर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जे तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

साम टिव्ही ब्युरो

Intelligence Bureau Recruitment:

केंद्रीय गृह मंत्रालयाने इंटेलिजेंस ब्युरो ACIO, JIO, SA आणि इतर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जे तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. पात्र उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर त्यांचे अर्ज पाठवून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. या भरतीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 60 दिवस आहे.

कोणत्या पदांवर निघाली भरती?

या भरतीद्वारे 660 पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी लक्षात घ्यावं की, प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी.  (Latest Marathi News)

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वय 27 वर्षे आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया

इंटेलिजन्स ब्युरो (IB) भर्ती 2024 साठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी फेरीचा समावेश आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, निवड फेरी प्रक्रियेदरम्यान मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना वेगवेगळी पदे दिली जातील. ज्या आधारावर त्यांची निवड केली जाईल. www.mha.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध अधिकृत अधिसूचनेमध्ये उमेदवारांच्या निवड प्रक्रियेसंबंधी संपूर्ण माहिती देण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाइटवर विश्वास ठेवू नका.

अर्ज कसा करायचा?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना त्यांची सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी लागतील.

पत्ता- संयुक्त उपसंचालक/जी-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापुधाम, नवी दिल्ली-110021

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandvi Recipe: नाश्त्याला झटपट बनवा गुजराती स्टाईल खांडवी, मिनिटात होईल फस्त

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

Success Story: रोज ७-८ तास अभ्यास, रेल्वेत नोकरी करत दिली UPSC; तिसऱ्या प्रयत्नात IAS; रिया सैनी यांचा प्रेरणादायी प्रवास

Kendra Trikona Rajyog: शनीने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींचं नशीब बदलून मिळणार घवघवीत यश

SCROLL FOR NEXT