Indonesia Fire Saam TV
देश विदेश

Indonesia Oil Depot Fire: मोठी दुर्घटना! इंधन डेपोला भीषण आग; आगीत होरपळून १७ जणांचा मृत्यू

तेथील नागरिकांना तात्काळ अन्य ठिकाणी हालवण्यात आले.

Ruchika Jadhav

Indonesia Fire: इंडोनेशिया येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. भंजराण इंधन डेपोला काल शुक्रवारी भीषण आग लागली. यामध्ये १७ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं समजलं आहे. तसेच अनेक व्यक्तींना या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाली आहे. आग इतकी भीषण होती की, आसपासच्या परिसरात देखील ती पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे तेथील नागरिकांना तात्काळ अन्य ठिकाणी हालवण्यात आले. (Latest Fire News)

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील भंजराण डेपोला भीषण आग लागली होती. यात सरकारी इंधन डेपो आणि गॅस कंपनी असलेल्या पर्टामिनाजवळ दाड लोकवस्ती आहे. त्यामुळे येथील नागरिकांना लगेच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. उत्तर जकार्ताजवळील तनाह मेराह परिसरात ही घटना घडली आहे. इंडोनेशियातील हा सर्वात मोठा इंधन डेपो होता. येथून जवळपास २५ टक्के इंधन पुरवले जात होते.

इंधनाचे टँक असल्याने आग लागताच मोठा स्फोट झाला आणि एका क्षणात आगीने रौद्र रुप धारण केलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. तब्बल १८० अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच ३७ फायर इंजिन्स देखील आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling: कामाची बातमी! आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट, पुढचे ३ तास धो धो पावसाची शक्यता

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी अडवले, एसपीसोबत बाचाबाची, म्हणाले- 'तुम्ही मला तिथे...'

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० आले, सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? वाचा सविस्तर

Success Story: दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली, दिली UPSC परीक्षा, पहिल्या प्रयत्नात IPS; स्वीटी सहरावत यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT