Helicopter crash saam tv
देश विदेश

Helicopter crash: 24 तास बेपत्ता राहिल्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश, 8 जणांचा मृत्यू

Indonesia helicopter crash: इंडोनेशियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रडारशी संपर्क तुटल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. जंगलात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

इंडोनेशियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ तासांपूर्वी हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला होता. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरील एका व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचे तुकडे झालेले दिसतायत . हे हेलिकॉप्टर जंगलात कोसळल्यानंतर सरकारने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे.

रडार संपर्क तुटल्यानंतर शोधमोहीम सुरू

स्थानिक माध्यमांनुसार, बोर्नियो बेटावरील पाम तेलाच्या मळ्यांवरून उडत असताना हा अपघात घडला. रडार संपर्क तुटल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. तर सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे ते हेलिकॉप्टर एअरबस एच 130 चं होतं. ते पीटी मॅथ्यू एअर नुसंताराच्या मालकीचं होते. ते हेलिकॉप्टर कुठे जात होतं, हे पोलिसांनी स्पष्ट केलं नाही.

हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला?

सीएनएन इंडोनेशियाच्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टरला उड्डाण घेण्यासाठी ४५ मिनिटं लागली. हेलिकॉप्टर उड्डाणासाठी तयार असतानाच त्यात बिघाड झाला, पण वैमानिकांनी ते हवेतच ठेवलं. पाच मिनिटांनंतर, हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला आणि त्यानंतर ते कोसळल्याची माहिती मिळाली.

सेकाडाऊ पोलीस विभागाचे निरीक्षक झैनल अबिदिन यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलं तो परिसर डोंगराळ आहे, त्यामुळे बचाव आणि मदतकार्य करणं अवघड झालंय.

दरम्यान परिस्थिती कठीण असूनही, त्यांनी आठ मृतदेहांची ओळख पटवली आहे. मृतांपैकी सात जण इंडोनेशियन आहेत. एका मृताची ओळख मलेशियाचा नागरिक म्हणून पटली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

SCROLL FOR NEXT