IndiGo Engine Failure Saam TV (AI Image)
देश विदेश

२२४ जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे इंजिन हवेतच पडलं बंद; विमानतळावर 'फुल इमर्जन्सी', धडकी भरवणारा थरार

IndiGo Engine Failure: कोलकात्याहून चेन्नईला येणाऱ्या इंडिगोच्या 6E-723 विमानाचे डावे इंजिन लँडिंगपूर्वी बंद पडल्याने चेन्नई विमानतळावर पूर्ण इमर्जन्सी घोषित करण्यात आली.

Namdeo Kumbhar

IndiGo flight engine failure Chennai airport latest news : इंडिगोच्या एका विमानाचे उड्डाण केल्यानंतर काही वेळातच डावे इंजिन बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे चेन्नई विमानतळावर तातडीने इमर्जन्सी घोषित करण्यात आली. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने प्रसंगावधान राखत तात्काळ चेन्नई विमानतळावरील एटीसीसोबत (हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष-ATC) संपर्क साधला आणि विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले.

मंगळवारी रात्री उशिरा कोलकाताहून आलेल्या इंडिगोच्या विमानाचे लँडिंगच्या काही वेळापूर्वी डावे इंजिन निकामी झाल्याने चेन्नई विमानतळावर पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. या घटनेमुळे विमानतळावर भीतीचे वातावरण तयार झाले होते. पण विमानतळ प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व इमर्जन्सी टीमच्या वेळेवर केलेल्या नियोजनामुळे विमानावरील सर्व प्रवासी सुरक्षित असून एक मोठा अपघात टळला आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता ते चेन्नई दरम्यान २२४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-723 मध्ये ११ ऑगस्ट रोजी रात्री ११.२९ वाजता पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमान रात्री ११.३० वाजता पोहोचणार होते, परंतु विमान उतरवण्याची तयारी करत असताना वैमानिकाच्या लक्षात आले की डावे इंजिन बंद पडले आहे. त्याने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

त्यानंतर विमानतळ प्रशासनाने विमानाचे सुरक्षित लँडिंग सुलभ करण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद उपाययोजना सक्रिय केल्या. विमानातील सर्व २२४ प्रवाशांसह रात्री ११.३७ वाजता रनवे २५ वर सुरक्षितपणे उतरले. रात्री ११.४७ वाजता संपूर्ण आणीबाणी मागे घेण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: कर्जत खोपोलीमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT