Nasal Covid Vaccine INCOVACC launched, know how effective? SAAM TV
देश विदेश

Nasal Covid Vaccine: कोरोनाविरोधात देशातील पहिली नेझल व्हॅक्सिन 'INCOVACC' लाँच, जाणून घ्या किती प्रभावी?

Nasal Covid Vaccine: या नेझल व्हॅक्सिनमुळे कोणत्याही इंजेक्शनची गरज भासणार नाही असा दावा केला जात आहे. ही लस नाकात थेंब टाकून दिली जाणार आहे.

Chandrakant Jagtap

Nasal Covid Vaccine: प्रजासत्ताक दिनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भरताला महत्त्वाचे शस्त्र मिळाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशातील पहिली नेझल व्हॅक्सिन (Nasal Vaccine) 'इनकोव्हॅक' (iNCOVACC) लाँच केली आहे. ही लस हैदराबाद येथील भारत बायोटेकने तयार केली आहे.

भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही नेझल लस विकसित केली आहे. या लसीला iNCOVACC असे नाव देण्यात आले आहे. ही लस नाकातून शरीरात पोहोचवली जाते. ही लस शरीरात प्रवेश करताच कोरोनाचा संसर्ग (Corona) आणि संक्रमण दोन्ही रोखते. ही नेझल व्हॅक्सिन बूस्टर डोस म्हणून दिली जाऊ शकते.

या नेझल व्हॅक्सिनमुळे कोणत्याही इंजेक्शनची गरज भासणार नाही असा दावा केला जात आहे. ही लस नाकात थेंब टाकून दिली जाणार आहे. सरकारकडून iNCOVACC लसीचा प्रति डोस 325 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या लसीची किंमत 800 रुपये असेल.

मीडिया रिपोर्टनुसार, या नेझल व्हॅक्सिन इनकोव्हॅकचा वापर बूस्टर डोस म्हणून केला जाऊ शकतो. या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे Covaxin आणि Covishield लस घेतलेले लोकांनाही ही लस घेता येऊ शकते. ही लस 28 दिवसांच्या अंतराने दोन्ही नाकपुड्यांमध्ये घ्यावी लागते.

देशातील एकून कोरोनाबाधितांची संख्या 4,46,82,338 झाली आहे. मात्र देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,906 वर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 5,30,738 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. देशातील सध्याचा दिवसाचा संसर्ग दर o.o8 टक्के एवढा आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार,देशातील रिकव्हरी रेट 98.81 टक्के आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4,41,49,694 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. देशात आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसींचे 220.35 कोटी डोस देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT