भारतीय विद्यार्थ्याची चीनमध्ये निर्घृण हत्या Saam Tv
देश विदेश

भारतीय विद्यार्थ्याची चीनमध्ये निर्घृण हत्या

चीनमध्ये बिझनेस स्टडीचा अभ्यासक्रम शिकण्याकरिता गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पटना : चीनमध्ये China बिझनेस स्टडीचा अभ्यासक्रम शिकण्याकरिता गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या murder करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या तरुणाच्या शरीरावर body काही भागावर चाकूचे वार केल्याचे खुणा आढळले आहे. चीनमध्येच करण्यात आलेल्या शवविच्छेदना मधून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.

मात्र, चीनकडून आता याबाबतचे रिपोर्ट देण्यात टाळाटाळ होत असल्याचे नातेवाईकांचे सांगणे आहे. बिहारच्या Bihar गयामध्ये हा राहणारा विद्यार्थी नागसेन अमन चीन मधील विद्यापीठात University बिझनेसचे शिक्षण Business education घेत होता. त्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. त्याचा मृतदेह Corpses विद्यापीठामधील डॉरमेटरी Dormitory रुममध्ये खूप दिवसापासून पडून होती.

हे देखील पहा-

कोणालाच त्याचा पत्ता लागला नाही. काही दिवसानंतर जेव्हा त्याचा मृतदेह सडू लागण्याच्या मार्गावर होता. तेव्हा त्याच्या मृतदेहाचा वास सर्वत्र विद्यापीठामध्ये पसरायला सुरुवात झाली. यामुळे या हत्येचा उलगडा झाला आहे. चीनमध्येच अमनच्या मृतदेहाचे विच्छेदन कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेला, भारतीय Indian विद्यार्थी सिद्धार्थ जुमरानी याच्या उपस्थितीत पोस्टमार्टेम Postmortem करायला अमनच्या कुटुंबीयांनी परवानगी दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार अमनच्या शरीरावरील काही भागावर चाकूने वार केल्याचे खुणा आढळून आले आहेत. चीनकडून पोस्टमार्टम होईपर्यंत तत्परता दाखवण्यात आली होती. मात्र, यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचे तक्रार कुटुंबीयांनी यावेळी केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यापासून ते अमनचे पार्थिव पाठवण्यापर्यंत अशा कोणत्याही बाबती मध्ये चीनकडून प्रतिसाद मिळत नव्हता.

यानंतर भारत सरकारने मध्यस्थी केल्यावर चीन सरकारकडून थोड्या प्रमाणात हालचाली करण्यात आले आहेत. नागसेन अमन याचा मृतदेह आता ११ ऑगस्ट दिवशी भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याची कल्पना अमनच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याचे अधिकारी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT