Indian Railway  Saam Tv
देश विदेश

Railway Ticket Offer : रेल्वेची भन्नाट योजना, तिकिटावर २० टक्के सूट, अट फक्त एकच

How to book return ticket railway offer 2025 : रेल्वेच्या राउंड ट्रिप योजना अंतर्गत रिटर्न तिकिटावर 20% सूट मिळणार आहे. बुकिंग 14 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. जाण्याचा प्रवास 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 आणि परतीचा प्रवास 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यान असावा.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • रेल्वेची राउंड ट्रिप योजना जाहीर, रिटर्न तिकिटावर 20% सूट.

  • बुकिंगची सुरुवात 14 ऑगस्ट 2025 पासून.

  • जाण्याचा प्रवास 13-26 ऑक्टोबर, परतीचा प्रवास 17 नोव्हेंबर-1 डिसेंबर.

  • सर्व श्रेणी व बहुतेक गाड्यांसाठी योजना लागू, फ्लेक्सी भाडे गाड्यांना अपवाद.

Indian Railways 20% discount festive season round trip tickets : सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने एक भन्नाट योजना जाहीर केली आहे. कोट्यवधी प्रवाशांच्या फायद्यासाठी रेल्वेने राऊंट ट्रिप योजना जाहीर केली आहे. रेल्वे प्रवास करताना रिटर्न तिकिट बूक केल्यास २० टक्क्यांची सूट मिळणार आहे. ही ऑफर मर्यादीत काळासाठी उपलब्ध आहे. प्रायोगिक पातळीवर रेल्वेकडून ही योजन सुरू करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास होतो, अनेकजण घराबाहेर पडत असतात, त्यामुळे ही संधी साधत रेल्वेकडून राऊंड ट्रीप योजना आणली आहे. (Festive travel railway scheme round trip discount)

गर्दी टाळण्यासाठी, तिकिटांचे आरक्षण सुलभ करणे, प्रवाशांना सुविधा देणे, सणासुदीच्या काळात गर्दीचे समान वितरण करणे आणि विशेष रेल्वेसह रेल्वेचा दोन्ही दिशांनी वापर सुनिश्चित करण्यासाठी रेल्वेने ही योजना आणली आहे. सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीसाठी राउंड ट्रिप पॅकेज नावाची प्रायोगिक योजना रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे. प्रवासी दिलेल्या मुदतीत रिटर्न तिकीट बुक करत असेल तर त्याला तिकिटावर 20 टक्के सूट मिळणार आहे.

कधीपासून योजना सुरू होणार ?

रेल्वेच्या राऊंड ट्रिप योजनेअंतर्गत 14 ऑगस्टपासून तिकिट बूक करता येईल. या योजनेनुसार प्रवासी १३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यानची तिकीटं बुक करता येतील. तर, रिटर्न तिकीट १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ चं तिकीट कनेक्टिंग जर्नी पर्याय वापरुन बुक करावं लागेल.

कोणत्या तिकिटावर ही योजना?

ही योजना सर्व श्रेणींसाठी आणि सर्व रेल्वे, विशेष रेल्वेसह (डिमांडवर रेल्वे) लागू असेल, परंतु फ्लेक्सी भाडे असलेल्या रेल्वेसाठी लागू होणार नाही. या तिकिटांवर कोणत्याही प्रवासात बदल करण्याची परवानगी नसेल. परतीच्या प्रवासाच्या सवलतीच्या भाड्यावर बुकिंग करताना कोणतेही सवलत, रेल्वे प्रवास कूपन, व्हाउचर आधारित बुकिंग, पास किंवा PTO इत्यादी लागू होणार नाहीत. जाण्याचा आणि परतीचा प्रवास एकाच पद्धतीने बुक करणे आवश्यक आहे - एकतर:ऑनलाइन (इंटरनेट) बुकिंग, किंवा आरक्षण कार्यालयातील काउंटर बुकिंग

आरक्षण कधीपासून ?

या योजने अंतर्गत, एकाच प्रवाशांच्या गटासाठी जाण्याचा आणि परतीचा प्रवास एकत्र बुक केल्यास सवलत मिळेल. परतीच्या प्रवासाची प्रवासी माहिती जाण्याच्या प्रवासासारखीच असेल.

आरक्षणाची सुरुवात 14 ऑगस्ट 2025 पासून होईल. अग्रिम आरक्षण तारीख (ARP) 13 ऑक्टोबर 2025 असेल. जाण्याचे तिकीट प्रथम 13 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत रेल्वेच्या प्रारंभ तारखेसाठी बुक करावे लागेल आणि त्यानंतर परतीच्या प्रवासाचे तिकीट 17 नोव्हेंबर 2025 ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत रेल्वेच्या प्रारंभ तारखेसाठी कनेक्टिंग जर्नी सुविधेद्वारे बुक करावे लागेल.

ही बुकिंग केवळ दोन्ही दिशांच्या पक्क्या तिकिटांसाठीच परवानगी असेल. परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावर एकूण 20% सवलत दिली जाईल. या योजने अंतर्गत बुकिंग जाण्याचा आणि परतीचा प्रवास एकाच श्रेणीसाठी आणि एकाच गंतव्यस्थान जोडीसाठी (O-D pair) असावे.या योजने अंतर्गत बुक केलेल्या तिकिटांसाठी भाड्याची परतफेड परवानगी नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं! अनेकांची घरे उध्वस्त, २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

Manoj jarange patil protest live updates : आजपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Pune Holiday: महत्त्वाची बातमी! पुण्यातील शाळा आज बंद, सरकारी कार्यालयांनाही सुट्टी

Maratha Protest : आरक्षणावर तोडगा निघणार? वर्षा बंगल्यावर फडणवीस, पवार अन् शिंदेंमध्ये आज खलबतं

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! वाहतूक कोंडीची कटकट संपणार, सर्वात मोठा उड्डाणपूल आज खुला होणार

SCROLL FOR NEXT