Indian Navy Recruitment Saam TV
देश विदेश

Indian Navy Recruitment: परीक्षेशिवाय नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, पगार 56000 पेक्षा जास्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Indian Navy Job Bharti: परीक्षेशिवाय नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, पगार 56000 पेक्षा जास्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Satish Kengar

Indian Navy Recruitment 2023 Notification:

भारतीय नौदलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने जून 2024 अभ्यासक्रमासाठी 224 शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्ससाठी (एसएससी ऑफिसर) अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर २०२३ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinIndianavy.gov.in वर जाऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. एकूण २२४ पदांवर भरती केली जाणार आहे.

भारतीय नौदलाने एसएससी परीक्षेसंबंधी सर्व आवश्यक माहिती नमूद करून पीडीएफ स्वरूपात अधिकृत अधिसूचना जारी केली. ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना भारतीय नौदल अकादमी, एझिमाला केरळ येथे पुढील प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नौदलात भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या

या भरती अंतर्गत २२४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये शिक्षण शाखेसाठी १८, तांत्रिक शाखेसाठी १०० आणि Executive साठी १०६ जागा आहेत. (Latest Marathi News)

सामान्य सेवा {GS(X)/Hydro Cadre}: ४० पदे

हवाई वाहतूक नियंत्रक (ATC): ८ पदे

नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर: १८ पदे

पायलट: २० पदे

लॉजिस्टिक्स: २० पदे

शिक्षण : १८ पदे

अभियांत्रिकी शाखा {सामान्य सेवा (GS)}: ३० पदे

इलेक्ट्रिकल शाखा {सामान्य सेवा (GS)}: ५० पदे

नेव्हल कन्स्ट्रक्टर: २० पदे

फॉर्म भरण्याची पात्रता

Executive शाखा: उमेदवारांना किमान ६०% गुणांसह कोणत्याही विषयात BE/B.Tech असणे आवश्यक आहे.

शिक्षण शाखा: उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात ६०% गुणांसह M.Sc पदवी असणे आवश्यक आहे.

तांत्रिक शाखा: (i) ऑटोमेशनसह मेकॅनिकल/मेकॅनिकलमध्ये किमान 60% गुणांसह BE/B.Tech मरीन, इन्स्ट्रुमेंटेशन, उत्पादन, एरोनॉटिक्स, औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन, नियंत्रण अभियांत्रिकी, एरो स्पेस; ऑटोमोबाईल धातूविज्ञान, मेकॅट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोलशी संबंधित शाखेत पदवी असणे आवश्यक आहे.

अर्जाची लिंक आणि अधिसूचनासाठी 'येथे' किल्क करा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT