viral news x
देश विदेश

सोशल मीडियावर प्रेम, पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटायला भारतीय बॉयफ्रेंडने हद्द पार केली; नंतर त्याच्यासोबत घडलं भयंकर

Viral News : भारतीय तरुणाची पाकिस्तानमधल्या तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली. हा तरुण पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला. या मुलीला भेटण्यासाठी तो पाकिस्तानमध्ये गेला. कागदपत्रे नसल्याने हेर समजून पोलिसांनी त्याला अटक केली.

Yash Shirke

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका भारतीय तरुणाची पाकिस्तानी तरुणीशी ऑनलाइन भेट झाली. हा तरुण पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला. मुलीला भेटण्यासाठी तो पाकिस्तानला पोहोचला. कागदपत्रे नसल्याने पाकिस्तानी पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने या तरुणाला एका वर्षाची शिक्षा सुनावली. सोबत ५,००० रुपये दंड देखील ठोठावला. हा तरुण अजूनही पाकिस्तानच्या तुरुंगात आहे.

हे प्रकरण उत्तरप्रदेशातील नांगला खिटकरी गावाशी संबंधित आहे. बादल बाबू हा तरुण सोशल मीडियावर पाकिस्तानमधील मंडी बहाउद्दीन येथे राहणाऱ्या सना राणीच्या प्रेमात पडला. सनाला भेटण्यासाठी तो सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला. २७ डिसेंबर २०२४ रोजी त्याला पाकिस्तानच्या पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले.

पाकिस्तानमधील वकील फियाज रामे यांनी सोशल मीडियाद्वारे बादल बाबूच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. बादलच्या घरती परिस्थिती पाहून फियाज यांनी पैसे न घेता बादलचा खटला लढण्याची घोषणा केली. १० जानेवारी २०२५ पासून फियाज रामे न्यायालयात बादल बाबूची बाजू मांडत असल्याची माहिती समोर आली आहे. एका वर्षापेक्षा कमी शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असून बादल लवकरात लवकर मायदेशी परतावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे फियाज रामे यांनी म्हटले आहे.

फियाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी न्यायालयीन सुनावणीत सना राणीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. बादल कधीपासून तुझ्या संपर्कात आहे असे सनाला न्यायालयाने विचारले. बादल आणि सना यांची नजरानजर झाली, पण त्यांना एकमेकांशी संवाद साधता आला नाही. बादल बाबूसोबतच्या फेसबुक चॅटच्या आधारे, पाकिस्तानी न्यायालयाने बादलला गुप्तहेर मानले नाही. पण बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्याच्या गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शिवसेनेची कोल्हापुरात बाईक रॅली

राजकारण तापलं; वंचितच्या रॅलीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न, सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप, VIDEO

Aawaj Maharashtracha Nagpur: 'पदवी आहे, पण नोकरी नाही'; नागपूरच्या तरुणांचा राजकारण्यांना सवाल

ग्रीनलँडमध्ये “I Love You” कसं म्हणतात? शब्द वाचून व्हाल चकीत

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरूच, आणखी एका तरुणाला विष देऊन मारलं

SCROLL FOR NEXT