Indian Couple, Daughter Died In America Saam Digital
देश विदेश

Indian Couple, Daughter Died In America: ३४ कोटींच्या अलिशान बंगल्यात मृतावस्थेत आढळलं भारतीय वंशाचं दाम्पत्य अन् मुलगी, अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समधील घटनेने खळबळ

Indian Couple, Daughter Died In America: अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये राहात असलेलं भारतीय वंशाचं दाम्पत्य आणि त्यांची मुलगी मृतावस्थेत आढळले आहेत. ३४ कोटींच्या त्यांच्या अलिशान घरात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे मृतदेह पडले होते.

Sandeep Gawade

Indian Couple, Daughter Died In America

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये राहात असलेलं भारतीय वंशाचं दाम्पत्य आणि त्यांची मुलगी मृतावस्थेत आढळले आहेत. ३४ कोटींच्या त्यांच्या अलिशान घरात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे मृतदेह पडले होते. राकेश कमल, त्यांची पत्नी टीना आणि मुलगी एरियांना तिघांचीही कोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र राकेश यांच्या मृतदेहाशेजारी बंदूक सापडल्यामुळे घरगुती हिंसाचाराचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

डोव्हर शहरात ही घटना घडली असून डोव्हर शहर मॅसॅच्युसेट्सची राजधानी बोस्टनच्या नैऋत्येस सुमारे 32 किलोमीटर अंतरावर आहे. राकेश आणि टीना एडुनोव्हा नावाची शिक्षण संस्था चालवत होते. अलिकडेच ती बंद झाली होती. ऑनलाईन रेकॉर्डवरून हे जोडपे गेल्या काही वर्षांपासून कठीण परिस्थितीतून जात होते. दरम्यान दोन दिवसांपासून या कुटुंबाचा काही ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे नातेवाईक त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान ही घटना सामूहिक आत्महत्या आहे की हत्या यासंदर्भात अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. वैद्यकीय अहवालाची आल्यानंतर याचा खुलासा होऊ शकेल, त्याचा वाट पाहत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या घटनेवर कोणताही अंदाज व्यक्त करण्यास नकार दिला. या कुटुंबाचे शेजाऱ्यांशी देखील चांगले संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT