Indian Army PC On Pakistan Attack Saam Tv News
देश विदेश

वेळेत सुधारा... नाहीतर नकाशावरुन संपवून टाकू, पाकड्यांना निर्वाणीचा इशारा; भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत रणरागिनी काय म्हटल्या?

Indian Army PC on Pakistan Attack : पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर देत लाहोरसह अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Prashant Patil

नवी दिल्ली : भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय लष्करानं आता स्पष्ट केलं आहे. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं. गेल्या ६५ वर्षांमध्ये सिंधू कराराचं पालन करणं ही भारताची सहनशिलता आहे. यापुढे भारत आपल्या हक्काचं पाणी वापरणार, असंही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर देत लाहोरसह अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने तो हल्ला उधळवून लावला आणि प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या रडार यंत्रणा निष्क्रिय केलं असल्याची माहिती देण्यात आली. भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिली.

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी भागावर हल्ला केला नव्हता. पाकिस्तानने जर भारतावर हल्ला केला तर त्याला उत्तर देणार. त्यानंतर अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह भारताच्या १५ शहरांवर पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्याला उत्तर देत तो हल्ला निष्क्रिय केला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या काही ठिकाणच्या रडार यंत्रणा निष्क्रिय केली. त्यामध्ये लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करण्यात आली. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि तोफांचा हल्ला केला. त्यामध्ये कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पुंछ या ठिकाणांचा समावेश आहे. त्यामध्ये १६ नागरिकांचा मृत्यू झाला. तीन महिलांचा त्यामध्ये समावेश आहे. एकंदरीत भारताने पाकड्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्याच्या उमरी मेघे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा एल्गार; गृहपालांच्या बदलीची मागणी

Belly Fat: जीम-डाएटने बेली फॅट कमी होत नाहीये? तुमची ही एक चूक ठरतेय धोकादायक

Poonam Pandey: आधी मरणाचं नाटक आणि आता म्हणते, 'मी प्रेग्नेंट नाही...'; पूनम पांडेने पुन्हा केली चाहत्यांची मस्करी

NHAI मध्ये काम करण्याची संधी; समर इंटर्नशिप सुरु; मिळणार स्टायपेंड; वाचा अर्जप्रक्रिया

Gulkand Benefits In Summer: उन्हाळ्यात दररोज १ चमचा 'गुलकंद' खाल्ल्याने शरीरात होतील 5 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT