India Vs Pakistan Saam Tv
देश विदेश

India Vs Pakistan: पाकिस्तानचा मध्यरात्री भ्याड हल्ला, ड्रोनने 26 ठिकाणं टार्गेट, घरांच्या भिंती पडल्या, वाहनांच्या काचा फुटल्या | VIDEO

India Vs Pakistan War: काल रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर हल्ला केला. पाकिस्तानने सीमालगतच्या भागात ड्रोनने हल्ला केला. यात जम्मू काश्मीर, जालंधर अशा सीमालगतच्या भागातील घरांचे खूप नुकसान झाले आहे.

Siddhi Hande

भारत पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काल रात्री पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर हल्ला केला. काल संध्याकाळी पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला भारतानेदेखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये भारताचे खूप नुकसान झाले आहे. भारत पाकिस्तान सीमेलगतच्या भागातील ठिकाणी ड्रोनच्या हमल्यात घरांचे दुकांनाचे नुकसान झाले आहे.

भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केले. त्यानंतर पाकिस्तानच्या खुरापती सुरु आहे. पाकिस्तानने एलओसीवरील सीमालगतच्या अनेक ठिकाणांना टार्गेट केले आहे. त्यानंतर भारतानेदेखील उत्तर दिले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील सर्व एअरलाइन्स बंद करण्यात आल्या आहे. मात्र, काल झालेल्या या हल्ल्यात भारताचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

जम्मू काश्मीरमधील घरांचे नुकसान (Jammu Kashmir House Breaks In Pakistan India War)

काल रात्री पाकिस्तानने भारताच्या सीमेलगतच्या २६ ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी ड्रोनचा वापर केला. यामुळे पंजाबमधील जालंधर, जम्मू काश्मीरमधील राजौरी येथील अनेक घरांचे नुकसान झाले आहेत. याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

यामध्ये जम्मू काश्मीरमधील अनेक घरे पडलेली दिसत आहे. घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. छत पडलेलं आहेत. याचसोबत पंजाबमधील एका ठिकाणी ड्रोन हल्ल्यात कारचे नुकसान झालं आहे. कारची काच पूर्णपणे फुटली आहे.तसेच काही घरांवर पाकिस्तानच्या ड्रोनचे काही तुकडे पडलेले आहे. यामुळे मात्र, नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारत पाकिस्तानच्या या हल्ल्यात अनेक सैनिकांनादेखील आपला जीव गमवावा लागला आहे. काल घाटकोपरमधील येथील एक जवान सैनिक झाला. तसेच या युद्धाचा सर्वसामान्य लोकांवरदेखील परिणाम होत आहे. अनेक स्थानिक लोकदेखील या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत तर अनेकजण जखमी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT