India Hydrogen Train saam tv
देश विदेश

India Hydrogen Train: भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन 17 जुलैला धावणार; फक्त ५ रुपयांत करा प्रवास, मार्ग आणि स्थानकं कोणती?

Hydrogen Train in India : भारतीय रेल्वे 17 जुलै रोजी देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी प्रवासी ट्रेन सुरू करणार आहे. जींद- सोनीपत मार्गावर धावणारी ही ट्रेन पर्यावरणपूरक, शून्य प्रदूषण करणारी आणि कमी भाड्यात प्रवासाची सुविधा देणारी ठरणार असून भारताच्या ग्रीन ट्रान्सपोर्ट मिशनमधील महत्त्वाचा टप्पा मानली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय रेल्वे 17 जुलै रोजी देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी प्रवासी ट्रेन सुरू करण्याच्या तयारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. हरियाणातील जींद ते सोनीपत या मार्गावर ही ट्रेन धावणार असून पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने भारताने टाकलेलं हे एक मोठं पाऊल मानलं जातंय.

हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या ट्रेनमधून जवळपास शून्य प्रदूषण होणार आहे. ग्रीन ट्रान्सपोर्ट मिशन आणि 'मेक इन इंडिया' अभियानातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय.

फक्त 5 रुपयांत प्रवासाची संधी

या ट्रेनचं भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्यात आलंय. रेल्वेने किमान 5 रुपये आणि कमाल 25 रुपये इतके तिकीटदर निश्चित केलेत. जींद ते सोनीपत हा सुमारे 90 किलोमीटरचा प्रवास ही ट्रेन अवघ्या एका तासात पूर्ण करणार आहे. सध्या याच मार्गावर धावणाऱ्या डीएमयू ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी जवळपास दोन तास लागतात. या नव्या ट्रेनमध्ये एकावेळी सुमारे 2,500 प्रवासी प्रवास करू शकतील.

हायड्रोजनवर धावणार, धूर निघणार नाही

या ट्रेनमध्ये 1200 किलोवॅट क्षमतेची हायड्रोजन फ्युएल सेल सिस्टीम बसवण्यात आलीये. डिझेलचा वापर न करता हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज तयार केली जाणार असून त्यावर ट्रेन धावणार आहे. या प्रक्रियेदरम्यान कार्बन उत्सर्जन किंवा धूर बाहेर पडत नाही. केवळ वाफ आणि उष्णता तयार होत असल्यामुळे ही ट्रेन पर्यावरणासाठी अधिक सुरक्षित मानली जाते. एकदा हायड्रोजन भरल्यानंतर ही ट्रेन सुमारे 250 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

सुरक्षेसाठी आधुनिक यंत्रणा

हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर असल्याने सुरक्षेवरही विशेष भर देण्यात आलाय. ट्रेनमध्ये 27 हायड्रोजन सिलिंडर बसवण्यात आलेत. हायड्रोजन गळती तात्काळ ओळखणारे सेन्सर, फायर डिटेक्टर आणि आधुनिक नियंत्रण सिस्टीम बसवण्यात आली असून त्यांची नियमित तपासणी केली जाणारे. या ट्रेनची रचना लखनऊ इथल्ा आरडीएसओने तयार केली असून चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (ICF) तिची निर्मिती करण्यात आली आहे.

89 कोटींचा प्रकल्प

सुमारे 89 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचं मानलं जातंय. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास भविष्यात देशातील इतर रेल्वे मार्गांवरही हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याचा रेल्वेचा विचार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT