Pakistan cyber force attack  Saam TV News
देश विदेश

Breaking News : पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ला, संरक्षण संकेतस्थळे हॅक

India Pakistan cyber war : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सजग भूमिका घेत सायबर हल्ल्यांचा मुकाबला सुरू केला आहे. पाकिस्तानच्या सायबर फोर्सने भारतीय संरक्षण संकेतस्थळे लक्ष्य केल्याचा दावा केला आहे.

Namdeo Kumbhar

Pakistan cyber force attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानची कोंडी केली आहे. पण पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायच्या नाव घेत नाहीत. पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पाकिस्तानमधून करण्यात आलेल्या सायबर हल्ल्यांमुळे संरक्षण कर्मचाऱ्यांची संवेदनशील माहिती धोक्यात आली आहे. त्यामध्ये संरक्षण कर्मचाऱ्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्सचा समावेश आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढलाय. त्यातच पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या संरक्षण संकेतस्थळांना लक्ष्य केलेय. ‘पाकिस्तान सायबर फोर्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका हॅकिंग ग्रुपने भारतावर सायबर हल्ला केलाय. पाकिस्तानी ग्रुपने भारताच्या संरक्षण विभागाची वेबसाइट हॅक केल्याचा दावा केलाय. त्यांनी असा दावा केलाय की, मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसेस आणि मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिसच्या संवेदनशील डेटा मिळवलाय.

या हल्ल्यानंतर भारताने सावध भूमिका घेतली आहे. आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडचे संकेतस्थळ तपासणीसाठी ऑफलाइन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या सायबर हल्ल्यामुळे झालेल्या संभाव्य नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सायबर सुरक्षा एक्सपोर्ट सध्या सायबरस्पेसवर नजर ठेवून आहेत. पाकिस्तानशी संबंधित धोकादायक गटांकडून होणाऱ्या सायबर हल्ल्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT