India Corona Update Saam Tv
देश विदेश

Covid-19 : चिंता वाढली! गेल्या २४ तासांत देशात १८,८४० नवे रुग्ण; तर ४३ मृत्यू

Corna Latest News : दिल्लीचा पॉझिटिव्हीटी रेट ३.१३% आहे तर दिल्लीत एकुण रुग्णसंख्या १९,३९,७५८ वर गेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्येच्या आलेख सतत वाढत असून गेल्या २४ तासांत भारतात १८,८४० रुग्ण आढळले आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतची ही नवीन कोरोना व्हायरसची (Covid19) आकडेवारी नोंदवली गेली आहे. तसेच गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसमुळे ४३ हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Health Minister) दिली आहे. (India Corona News In Marathi)

हे देखील पाहा -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज देशात १८,८४० रुग्ण आढळले आहेत. तर अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १,२५,०२८ आहे, तसेच पॉझिटिव्हीटी रेट (सकारात्मकता दर) ४.१४% इतका आहे. याव्यतिरिक्त, दिल्लीत गेल्या २४ तासांत ५३१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि ३ मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीचा पॉझिटिव्हीटी रेट ३.१३% आहे तर दिल्लीत एकुण रुग्णसंख्या १९,३९,७५८ वर गेली आहे.

दुसरीकडे, मुंबईत ५३० नवीन कोविड-१९ ची नोंद झाली आहे तर पॉझिटिव्ह रेट ५.२५% आहे आणि गेल्या २४ तासांत २ मृत्यू झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या ११,१७,८९७ वर पोहोचली, तर मृतांची संख्या १९,६२४ वर पोहोचली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT