India Corona Latest Update News SAAM TV
देश विदेश

Corona In India : देशातील नागरिकांची चिंता वाढली; कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, सक्रिय रुग्णात वाढ

देशात कोरोना पुन्हा डोके वर काढले आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : देशात कोरोना पुन्हा डोके वर काढले आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. देशात १२९ दिवसानंतर एका दिवसांत कोरोनाचे एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णानंतर देशातील आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आज रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत देशात गेल्या २४ तासांत १०७१ रुग्ण आढळले. त्यामुळे देशात सध्या ५,९१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दिवसभरात कोरोनामुळे (Corona) ३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ५,३०,९०२ इतकी झाली आहे.

देशात कोरोना विषाणूमुळे राजस्थान आणि महाराष्ट्रात (Maharashtra) एक-एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर केरळमध्येही एकाचा कोरोनाने एकाचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या संख्या ४,४६, ९५,४२० इतकी झाली आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.९ टक्के झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूने बाधित झालेल्या नागरिकांची संख्या ४,४१,५८,७०३ इतकी झाली. सध्या देशात कोरोनाचा मृत्यू दर १.१९ टक्के झाला आहे. देशात आतापर्यंत २२०.६५ कोटी जणांचे लसीकरण झाले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्र अन् कर्नाटकला धोका

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने देशभरात मोठा हाहाकार माजला आहे. कोरोनाचा XBB.1.16 व्हेरिएंट कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. INSACOGने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या XBB.1.16 व्हेरिएंची एकूण 76 प्रकरणे भारतात आढळून आली आहेत. या व्हेरिएंची सर्वाधिक प्रकरणे कर्नाटकात आढळून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरातप्रकरणी चाकणकर अडचणीत

Maharashtra Live News Update: मुंबईतील रोहित शेट्टी फायरिंग प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महापारेषणची नवी दिल्लीत चर्चा; केंद्रीय ऊर्जामंत्र्यांपासून महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडून कौतुकाची थाप

मोठी बातमी! 6 आमदारांचं तडकाफडकी निलंबन; राज्याच्या राजकारणाला हादरा

Ashok Kharat Case: लॅपटॉप,हार्ड डिस्क आणि...; भोंदूबाबा अशोक खरातच्या घरात पोलिसांना काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT