Indian Government Advisory On Canada Saam Tv
देश विदेश

India Canada Tension: कॅनडातील भारतीयांनी 'या' भागात जाणं टाळा, केंद्र सरकारने जाहीर केली अ‍ॅडव्हायझरी...

IND Advisory On Canada: कॅनडातील भारतीयांनी 'या' भागात जाणं टाळा, केंद्र सरकारने जाहीर केली अ‍ॅडव्हायझरी...

Satish Kengar

Indian Government Advisory On Canada:

कॅनडामध्ये राहणाऱ्या आणि कॅनडात जाण्याचा विचार करत असलेल्या भारतीयांसाठी केंद्र सरकारने अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. यात सांगण्यात आले आहे की, भारतीय नागरिकांनी तुम्हाला ज्या भागात लक्ष्य केले जाऊ शकते, त्या भागात जाणं टाळा.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरी म्हटले आहे की, भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या कॅनडातील राजदूत आणि भारतीय समुदायाच्या लोकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भारतीय लोकांनी अशा घटना घडलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. मंत्रालयाने म्हटले आहे की, कॅनडामधील आमची उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावास कार्यालये भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी त्यांच्या संपर्कात राहतील.

मंत्रालयाने म्हटले आहे की, 'अलीकडेच भारतीय राजदूत आणि भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या भारतीय समुदायाच्या एका वर्गाला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतीय वंशाच्या लोकांनी अशा घटना घडलेल्या किंवा अशा घटना घडण्याची शक्यता असलेल्या भागात जाऊ नये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

2.5 लाख विद्यार्थी आणि 7 लाख अनिवासी भारतीयांचं वाढलं टेन्शन

दरम्यान, दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे कॅनडामध्ये राहणारे भारतीय वंशाचे विद्यार्थीही घाबरले आहेत. कॅनडात एकूण 2 लाख 30 हजार भारतीय विद्यार्थी राहतात आणि 7 लाख अनिवासी भारतीय आहेत.  (Latest Marathi News)

भारत आणि कॅनडामधील तणावादरम्यान खलिस्तानी संघटनेने शिख फॉर जस्टिनने हिंदू समुदायाच्या लोकांना कॅनडा सोडण्याची धमकी दिली आहे. यानंतर अतिरेकी भारतीय वंशाच्या लोकांना लक्ष्य करू शकतात, अशी भीती वाढली आहे. भारताने यापूर्वीही अशा घटनांचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT