Know About India's First Underwater Metro Rail Service Which Is To be Inaugurated by PM Narendra Modi Saam tv
देश विदेश

Kolkata Underwater Metro: देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोसेवा होणार सुरु; पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन, कसा असेल मार्ग?

India's First Underwater Metro Service in Kolkata: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ६ मार्चला पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकातामधील देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन करणार आहे.

Vishal Gangurde

India's First Underwater Metro :

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ६ मार्चला पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकातामधील देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन करणार आहेत. पहिली अंडरवॉटर मेट्रो हावडा मैदान आणि एस्प्लेनेडदरम्यान धावणार आहे. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान, एस्प्लेनेड मेट्रो स्टेशन , कवि सुभाष स्टेशन-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि तारातला माझेरहाट मेट्रो सेक्शनचं उद्घाटन करणार आहेत.

अंडरवॉटर मेट्रो ही हुगळी नदीतून ३२ मीटर खोलावरून धावणार आहे. या मेट्रोमुळे लोकांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे. हुगळी नदीतील पाण्याखाली धावणारी मेट्रो ही कोलकाताला शहराला जोडणार आहे.

कोलकाता मेट्रो रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी 'आजतक'ला सांगितलं की, 'ही मेट्रोसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गिफ्ट आहे. उद्घाटनामुळे कोलकतामधील लोकांचं एक स्वप्न पूर्ण होणार आहे'.

कोलकाता मेट्रो हावडा मेट्रो देशातील नदीच्या पाण्याखाली धावणारी मेट्रो आहे. पाण्याखाली मेट्रोसेवा तयार करणाऱ्या इंजिनिअरिंगचं कौतुक होत आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, कोलकाता मेट्रो सेवेचं काम १९७० साली सुरु केलं होतं. केंद्र सरकारच्या गेल्या १० वर्षाच्या काळात या कामाला गती मिळाली'.'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा विकास करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. २०४७ साली भारताचा विकास होणार आहे. तसेच कोलकाता या मेट्रोच्या विविध टप्प्याचं काम पूर्ण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT