Kalyan Skywalk News Saam
देश विदेश

पावळ्यानंतर हिवाळ्यात हाडं गोठणार; La Niñaचा भारतासाठी इशारा, कोणत्या राज्याला सर्वाधिक फटका?

La Niña Predicted to Lower Temperatures in North India: उत्तर भारतात नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये तापमान अधिक घटण्याची शक्यता. यामुळे तीव्र थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

  • कोसळधार पावसापाठोपाठ कडाक्याची थंडी.

  • La Niñaमुळे भारतात थंडी वाढणार.

  • नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये थंडी वाढण्याती शक्यता.

देशात पावसाळा संपत आला आहे. काही दिवसांत हिवाळा सुरू होईल. दसरा सरल्यानंतर वातावरणात गारवा जाणवू लागतो. यावर्षी पावसानं जोरदार झोडप घातली. धरणे, नद्या भरल्या. तर काही गावं पुरामुळे उद्ध्वस्त झाली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, La Niña हवामान पॅटर्न भारतात थंडी वाढण्यास कारणीभूत ठरणार आहे. उत्तर भारतात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तापमान अधिक घटण्याची शक्यता आहे.

प्रशांत महासागराभोवतीचा परिसर अधिक थंड होईल. ज्याचा थेट परिणाम भारतातील हवामानावर दिसेल. यूएस नॅशनल वेदर सर्विसच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने ऑक्टोबर आणि डिसेंबर दरम्यान, La Niña विकसित होण्याची ७१ टक्के शक्यता व्यक्त केली आहे. जागतिक हवामान संघटनेनं सप्टेंबरच्या सुरूवातीलाच La Niñaचा भारतावर होणारा थंडीचा परिणाम दर्शवला आहे.

यामुळे तात्पुरत्या थंडीचा अनुभव मिळेल. परंतु, बहुतांश देशांमध्ये जागतिक तापमान सरासरीहून जास्त राहिल, असा अंदाज संघटनेनं वर्तवला आहे. भारतात, मुसळधार पावसानंतर लोकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागू शकतो.

हवामानशास्त्रज्ज्ञ नेमकं काय म्हणाले?

जागतिक हवामान संघटनेनं नमुद केलं की, La Niña हवामान आणि हवामान पद्धतींवर पुन्हा परिणाम करणार आहे. बहुतांश देशांमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. भारतात पावसाळ्यानंतर थंडीचा तीव्र अनुभव मिळण्याची शक्यता आहे.

भारतावर La Niña प्रभावाची शक्यता

पॅसिफिक महासागरातील हंगामी स्वरूप असलेल्या ला निनामुळे भूमध्यरेखीय पॅसिफिकमधील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान हे सरासरीपेक्षा कमी होते. ला निनामुळे प्रभावित झालेला भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. भूमध्यरेखेच्या जवळ असलेल्या भारतात या स्थितीमुळे हवामानावर लक्षणीय फरक पडू शकतो. विशेषत: उत्तर भारतात हिवाळ्याच्या काळात अधिक थंडी जाणवू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral : नवऱ्याची ५००हून अधिक अफेअर्स, वैतागलेल्या बायकोने कॉमिकमधून मांडल्या व्यथा; नेमकं काय प्रकरण? वाचा

Gold Jewellery: सोनार गुलाबी रंगाच्या कागदात सोने गुंडाळून का देतो? यामागचं कारण काय?

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

SCROLL FOR NEXT