pakistan pm x
देश विदेश

India Pakistan War : भारताचं रौद्र रुप, थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानच्या घराजवळ हल्ला, कशी आहे परिस्थिती?

Ind Vs Pak : पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट भारताच्या ड्रोन्समुळे झाल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधींचे उल्लंघन केल्याने युद्धाला सुरुवात झाली आहे.

Yash Shirke

भारत-पाकिस्तान तणाव वाढत चालला आहे. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर सीमावर्ती भागांत गोळीबार केला. काल त्यांनी भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हा डाव फसल्यानंतर रात्रीच्या अंधारात पाकिस्तानने जम्मूमध्ये मिसाईल हल्ले केले. मिसाईल्ससह ड्रोन हल्ले ही करण्यात आले. हे हल्ले भारताने पाडले. त्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून ड्रोन हल्ले सुरु केले. याच दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शफीर यांच्या घराजवळ हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानमधील लाहोरमध्ये त्यातही वॉल्टन विमानतळ आणि शहरातील छावणी क्षेत्राजवळ अनेक स्फोट झाल्याची नोंद झाली आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या यांच्या अधिकृत निवासस्थानापासून २० किमी अंतरावर मोठा स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शरीफ यांच्या घराजवळील हल्ला भारताने केल्याचे म्हटले जात आहे.

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानला जबरदस्त इशारा दिला. पाकिस्तानने कुरघोडी केल्या आहेत. पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या सर्व हल्ल्यांना वेळेत प्रत्युत्तर देत त्यांना अपयशी ठरवले. सोमवारी रात्री अचानक जम्मूच्या आकाशात पाकिस्तानचे अनेक ड्रोन घिरट्या घालू लागले. त्यानंतर भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली. भारताच्या अत्याधुनिक S-400 डिफेन्स सिस्टमने हे सर्व ड्रोन हवेतच पाडले. जम्मूमध्ये सायरन वाजवून नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले.

पाकिस्तानने जम्मू विमानतळ, रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत आणि आरएसपुरा भागात ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय यंत्रणांनी ते थोपवून धरले. याशिवाय, पठाणकोट एअरबेसवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, जो देखील भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी अपयशी ठरवला. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालत असल्याचे लक्षात येताच संपूर्ण भागात ब्लॅकआउट करण्यात आला. त्याचबरोबर पंजाबमधील अमृतसर आणि होशियारपूरमध्येही सुरक्षेच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT