India Corona Update Saam Tv
देश विदेश

India Corona Update : देशभरात कोरोनाचा धोका वाढला, एका दिवसात आढळले 10 हजारांहून अधिक नवीन रुग्ण

Shivani Tichkule

Corona Update News : भारतातील कोरोना व्हायरच्या संसर्गाच्या वेगाने सरकारसोबतच नागरिकांची चिंता वाढवली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशभरात सध्या कोरोनाने भीषण रूप धारण केले आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात मोठ्यासंख्येने कोरोना रुग्ण आढळले आहेत.  (Latest Marathi News)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 10,158 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, या संसर्गाचा दैनिक सकारात्मकता दर 4.42 टक्के झाला आहे.

याआधी बुधवारी भारतात कोरोनाचे (Corona) 7,830 नवीन रुग्ण आढळले होते. त्याचवेळी, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 40,215 वर पोहोचली आहे. यासह, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4 कोटी 47 लाख 76 हजार 2 इतकी झाली आहे.

दिल्लीतही कोरोनामुळे चिंता वाढली

दिल्लीत सध्या कोरोनाचे एकूण 3347 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1995 होम आयसोलेशनमध्ये असून 203 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. (Corona Update)

महाराष्ट्रात 1115 प्रकरणे समोर आली

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात एकाच दिवसात 1115 रुग्ण आढळले आहे. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 5421 सक्रिय रुग्ण आहेत. तसेचगेल्या 24 तासात मुंबईत कोरोनाचे एकूण 320 रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1577 इतकी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT