India vs China War Saam, Tv
देश विदेश

India vs China : भारत आणि चीनच्या संबंधात लक्ष देऊ नका, अन्यथा.., चीनची अमेरिकेला थेट धमकी

अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण, भारतासोबत (India) सुरू असलेल्या वादात ढवळाढवळ करू नका, अशी थेट धमकी चीनने अमेरिकेला दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण, भारतासोबत (India) सुरू असलेल्या वादात ढवळाढवळ करू नका, अशी थेट धमकी चीनने अमेरिकेला दिली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने काँग्रेसला सादर केलेल्या अहवालात चीनने धमकी दिल्याचा दावा केला आहे.  (Latest Marathi News)

या अहवालात पेंटागॉनने म्हटलं आहे, की चीनने (China) अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना भारतासोबतच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करू नये, केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. चीनचे म्हणणे आहे, की चीन भारताच्या सीमेवर असलेल्या तणाव कमी करु इच्छित आहे. जेणेकरून चीन आणि भारताचे संबंध सुधारतील आणि दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या व्यापारावर याचा परिणाम होणार नाही. भारत आणि चीनचे संबंध सुधारत असताना, अमेरिकेने यामध्ये ढवळाढवळ करू नये, असं चीनने म्हटलं आहे.

चीनच्या लष्करी उत्पादन क्षमतेबाबत काँग्रेसला दिलेल्या अहवालात पेंटागॉनने म्हटले आहे की, "पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) तणाव कमी करू इच्छित आहे. जेणेकरून भारत अमेरिकेच्या (America) जवळ जाऊ नये." पीआरसीच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना चीन आणि भारतासोबतच्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करू नये, असा इशारा दिला आहे.

पेंटागॉनने अहवालात म्हटले आहे, की पीएलएने 2021 मध्ये चीन-भारत सीमेच्या एका विभागात सैन्य तैनात केले आणि LAC वर पायाभूत सुविधा निर्माण करणे सुरू ठेवले. त्यानंतर चीन आणि भारत या दोन्ही देशांमधील चर्चा पुढे गेली नाही. कारण, दोन्ही देशांनी सीमेवरील आपआपली हद्द हटवण्यास विरोध दर्शविला आहे.

खरं तर, मे 2020 च्या सुरूवातीला, LAC वर अनेक ठिकाणी चीनी आणि भारतीय सैन्याच्या जवानांमध्ये चकमक झाली. काटेरी तारांमध्ये गुंडाळलेल्या लाठ्या आणि मोठमोठे दगड घेऊन दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांवर तुटून पडले. भारत आणि चीन यांच्यातील संघर्षामुळे सीमेच्या दोन्ही बाजूंना अधिक सैन्य तैनात करण्यात आले. पेंटागॉनच्या अहवालानुसार, सर्व देशांनी एकमेकांचे सैन्य मागे घेण्याची आणि स्टँडऑफपूर्वी स्थितीत परतण्याची मागणी केली, परंतु चीन किंवा भारत दोघांनीही त्या अटी मान्य केल्या नाहीत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:लातूरच्या एमआयडीसीत अल्युमिनियम दुकानाला भीषण आग

Shocking : भयंकर! ५०० हून अधिक तरुणींचे खासगी व्हिडिओ अन् फोटो; व्हायरल करण्याची धमकी देऊन कोट्यवधींना लुटलं

Nashik : मोठी बातमी! TCSचे ऑफिस बंद, सर्व कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश

Income Tax New Rule: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फॉर्म भरण्याच्या नियमात मोठे बदल

BJP CM: भारतात भाजपचे किती मुख्यमंत्री? एका क्लिकवर वाचा यादी

SCROLL FOR NEXT