India became 4th largest economy X
देश विदेश

भारतानं इतिहास घडवला! भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर, अमेरिकेकडून आर्थिक कोंडी तरीही मुसंडी

India became 4th largest economy : अमेरिकेनं भारताची आर्थिक कोंडी केल्यानंतरही भारतानं अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोठा इतिहास रचलाय. ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था आता आणखी मजबूत झालीय. भारताची कामगिरी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Yash Shirke

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

भारताने अखेर इतिहास घडवलाय. अनेक संकटांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारलीय. अमेरिकेने भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तरीही भारतीय अर्थव्यवस्थेने महासत्तांच्या स्पर्धेत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान मिळवलाय. आता आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे जगातील टॉप 5 अर्थव्यवस्था आणि त्यांचा जीडीपी किती आहे? पाहूयात..

भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर

देश- नॉमिनल जीडीपी

अमेरिका - 30.507 ट्रिलियन डॉलर

चीन- 19.231 ट्रिलियन डॉलर

जर्मनी- 4.744 ट्रिलियन डॉलर

भारत- 4.187 ट्रिलियन डॉलर

जपान- 4.186 ट्रिलियन डॉलर

जपानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्यामागे अमेरिका आणि इतर देशांनी लादलेले शुल्क आणि व्यापारी धोरणे कारणीभूत आहेत. तर दुसरीकडे भारताची अर्थव्यस्था चौथ्या क्रमांकावर पोहचण्यामागे देशातील पायाभूत प्रकल्पात होणारी वाढती गुंतवणुक, कार्यक्षम तरुण लोकसंख्या, IT आणि सेवा क्षेत्राचा झपाट्याने झालेला विकास अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीनंतर सीईओ बी.वी.आर सुब्रह्मण्यम यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल काय म्हटलं पाहूयात...

IMF च्या अंदाजानुसार, जर भारताचा विकास दर असाच राहिला तर भारत 2028 पर्यंत जर्मनीला मागे टाकून 4.9 ट्रिलियन डॉलर्सचा जीडीपी असणारी जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. त्यामुळे तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. तसेच गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा होईल. त्यामुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी कशाप्रकारे आगेकूच करतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: नोकरीत नव्या संधी मिळणार; या ४ राशीच्या व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

कल्याणजवळ शिक्षण संस्थेचा अनुदान घोटाळा? २ एकरऐवजी ७.५ एकर जमीन दाखवून कोट्यवधींची फसवणूक

Arshdeep Singh: अर्शदीपला 'ती' चूक पडली महागात, चांगली कामगिरी करूनही ICC कडून मोठी कारवाई

Maharashtra Live News Update : मुंबईच्या गोरेगावात १३ अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई

AhilyaNagar News: आई-बहिणीवरून शिवी द्याल तर बसेल दंड; कोळगावच्या निर्णयाची राज्यभरात चर्चा

SCROLL FOR NEXT