India and Bangladesh Tv9
देश विदेश

India-Bangladesh: भारत आणि बांगलादेशात मोठे करार; व्यापार, सागरी सीमा सुरक्षेसह विविध क्षेत्रात होणार भागीदारी

Bharat Jadhav

भारत आणि बांगलादेशात व्यापार, सागरी सीमा सुरक्षा, डिजिटल देवाणघेवाण यासह अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी करार झाला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शुक्रवारपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली.

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट हैदराबाद हाऊसमध्ये झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी शेख हसीना यांचे उत्साहात स्वागत केले. शेख हसीना यांच्याशी भेट झाल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकासाचा भागीदार आहे. बांगलादेशसोबतच्या आमच्या संबंधांना विशेष प्राधान्य देतो. बंगबंधूंचे स्थिर, समृद्ध आणि प्रगतीशील बांगलादेशचे स्वप्न साकार करु असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोणत्या क्षेत्रात करार झाला?

बांगलादेशातील वैद्यकीय रुग्णांसाठी ई-व्हिसा

बांगलादेशातील रंगपूर येथे भारताचे नवीन सहायक उच्चायुक्त

राजशाही आणि कोलकातादरम्यान नवीन रेल्वे सेवा

चितगाव आणि कोलकातादरम्यान नवीन बस सेवा

गेडे-दर्शन आणि हल्दीबारी-चिलाहाटी दरम्यान डाळगावपर्यंत मालगाडी सेवा सुरू केली जाणार.

अनुदानाअंतर्गत सिराजगंज येथे अंतर्देशीय कंटेनर डेपो (ICD) चे बांधकाम केलं जाणार.

बांगलादेशातील तीस्ता नदीचे संवर्धन आणि व्यवस्थापन प्रकल्पासाठी तांत्रिक शिष्टमंडळ बांगलादेशला जाणार. बांगलादेशी पोलीस अधिकाऱ्यांसाठी ३५० प्रशिक्षण स्लॉट

रुग्णांसाठी मुक्तीयोद्धा योजना

डिजिटल भागीदारीत मोठा करार

भारत आणि बांगलादेशामध्ये डिजिटल भागीदारी अंतर्गत करार झालेत. भारताचे परराष्ट्र सचिव आणि बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांनी डिजिटल सहकार्याशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांमध्ये हरित भागीदारीबाबतही करार झाला. दोन्ही देशांदरम्यान सागरी सहकार्य आणि ब्लू इकॉनॉमी यासंबंधीही करार झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT