INDIA bloc demand for ballot paper elections instead of EVM saam tv
देश विदेश

इंडिया आघाडीचा EVM हटावचा नारा, इंडिया आघाडीला हवी बॅलटवर निवडणूक

EVM vs Ballot Paper: ज्ञानेश कुमारांविरोधात आक्रमक झालेल्या इंडिया आघाडीनं आता आपली रणनीती बदललीय... ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासह बॅलट पेपरवरील निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कशी सक्रीय झालीय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मुख्य़ निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झालीय.. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यानंतर आता इंडिया आघाडी मतपत्रिकांवर निव़डणुका घेण्यासाठी सरसावलीय. इंडिया आघाडीच्या बैठकीत इव्हीएम हटावचा नारा देण्यात आलाय. यासाठी आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सरकारला काय इशारा दिलाय ऐका...

दुसरीकडे ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी इंडिया आघाडीनं काय रणनीती आखलीय? पाहूयात...

2 ते 8 ऑक्टोबर 2026

देशभरात जिल्हापातळीवर 'लोकतंत्र बचाओ' आंदोलने होणार

6 ऑक्टोबर 2026

विरोधी पक्षांचे सर्व खासदार थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार

मतदारांना मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहाराबद्दल जागृत करण्यासाठी विरोधक 5 संयुक्त सभा घेणार

1 नोव्हेंबर 2026

विरोधक दिल्लीत बॅलेट पेपरवरील निवडणुकीच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढणार

दुसरीकडे विरोधक निवडणुक हरल्यानं बॅलेट पेपरची मागणी करत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून होत असते. मात्र २०२४च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र तरीही लोकसभेतल्या भाषणात अखिलेश यादवांनी बॅलेटवर निवडणुकांची मागणी कायम ठेवली. तसंच बॅलेटवर निवडणुक झाल्यास 2027 च्या विधानसभेत एकही जागा भाजपला मिळणार नाही, असा इशाराही अखिलेश यादवांनी दिला होता...

मुळात गेल्या 10 वर्षांपासून विरोधक सातत्यानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करतायत...त्यात व्होट चोरी आणि निवडणुक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे देशातील वातावरण चांगलचं तापलयं...त्याचाच फायदा घेत विरोधकांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरील निवडणुकीकडेही आपला मोर्चा वळवलाय..मात्र याला किती यश येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री ही १ सवय लावून घ्या, काही दिवसांत होईल अशक्य वाटणारा चमत्कार

World Cup Schedule : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारताचे सामने कुणासोबत? पाकिस्तानविरोधात कधी भिडणार? A टू Z माहिती

ठाण्याच्या लेडी डॉनला वाचवतंय कोण? ठाणे बीडपेक्षा वाईट, राऊतांचा हल्लाबोल

ज्ञानेश कुमार हटवा, SIR याद्या गोठवा; मुंबईतील आंदोलनापूर्वी दिपकेंची मागणी

Fact Check: तुम्ही खाताय प्लास्टिकची अंडी? अंडी बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT