Income Tax Returns Updates
Income Tax Returns Updates Saam tv
देश विदेश

ITR : मुदत संपली, आता काय? १००० रुपये दंड देऊन भरू शकता आयटीआर, हे आहेत नियम

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: प्राप्तिकर परतावा (ITR) फाइल करण्याची अंतिम मुदत संपली आहे. आयटीआर फाइल (Income Tax) करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ होती. आता करदात्यांसाठी महत्वाचे असलेले आयटीआर फाइल करण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. मात्र, फक्त १ हजार रुपये दंड जमा करून तुम्ही आयटीआर फाइल करू शकता. जाणून घ्या काय आहेत नियम?

आयटीआर (ITR) दाखल करण्याची मुदत संपली आहे. आता आयटीआर फाइल करायची असल्यास करदात्यांना (Income Tax Payers) दंड भरावा लागणार आहे. आयकर विभागाच्या (Income Tax) नियमांनुसार, ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी दंडाची रक्कम १ हजारापर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

तर उत्पन्न (Income) पाच लाखांपेक्षा अधिक आहे तर, दंडाची रक्कम ५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर प्राप्तिकर परतावा फाइल अंतिम मुदतीनंतर ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत केली नाही तर, हीच दंडाची रक्कम दुप्पट होईल. म्हणजेच पाच हजार रुपयांऐवजी तुम्हाला १० हजार रुपये दंड भरावा लागेल.

प्राप्तिकराच्या सेक्शन २३४ एफ नुसार, रिटर्न (Income Tax Return) फाइल करण्याच्या अंतिम तारखेनंतर आयटीआर फाइल करण्यावर दंड स्वरुपात ५ हजार रुपये भरावे लागतील. पण जर संबंधित व्यक्तीचे उत्पन्न ५ लाखांपेक्षा अधिक नाही तर, आयटीआर फाइल करण्यासाठी एक हजार रुपये दंड भरून ते दाखल करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न त्याने निवडलेल्या टॅक्स स्लॅबनुसार, बेसिक एग्जेंप्शन मर्यादा पार करत नसल्यास त्याला उशिरा आयटीआर फाइल करताना दंडाच्या रकमेतून कोणतीही सूट मिळणार नाही.

शेवटच्या दिवशी आयटीआर फाइल करण्यात तेजी

सन २०२२-२३ साठी ५ कोटी ८२ लाख ८८ हजार ९६२ लोकांनी आतापर्यंत आयटीआर फाइल केलेला आहे. प्राप्तिकर विभागाच्या ट्विटर हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, आयटीआर फाइल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. या दिवशी रात्री ११ वाजेपर्यंत ६७,९७,०६७ फाइल करण्यात आले आहेत. केवळ एका तासात म्हणजेच रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान ४,५०,०१३ रिटर्न फाइल करण्यात आल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT