Income Tax officials conduct a search operation at the Lucknow residence of BSP MLA Umashankar Singh amid tight police security Saam Tv
देश विदेश

कॅन्सरग्रस्त आमदाराच्या घरी आयकर विभागाची धाड; 50 अधिकारी अन् पोलीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Cancer-Affected MLA Umashankar Singh Under Financial Investigation: लखनऊतील गोमतीनगर येथे बसपा आमदार उमाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापा टाकला आहे.

Omkar Sonawane

लखनऊमधील गोमतीनगर येथील बहुजन समाज पक्षाचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापा टाकला आहे. बलिया जिल्ह्यातील रसरा मतदारसंघाचे आमदार उमाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आयकर विभागाचे पथक कागदपत्रांची तपासणी करत आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजताच्या सुमारास बसपाचे एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापा टाकला. डझनभर अधिकाऱ्यांचे एक पथक आमदारांच्या निवासस्थानी पोहोचले, त्यांच्यासोबत मोठा पोलिस बंदोबस्त होता. पथक कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करत आहे.

रासरा येथील आमदार उमाशंकर सध्या कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि ते लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानी आयसोलेशनमध्ये ठेवले आहेत. आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेच्या चौकशीतून अचानक झालेल्या या कारवाईमुळे उत्तरप्रदेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात ५० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उमाशंकर सिंह हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) एक प्रमुख कंत्राटदार देखील आहेत. ते उत्तर प्रदेशातील बसपाचे एकमेव आमदार आहेत. अलिकडेच, मंत्री दयाशंकर सिंह यांच्याशी झालेल्या त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT