Shraddha Walker News saam tv
देश विदेश

Shraddha Walker case : श्रद्धा वालकरच्या फोनमध्ये आफताबची आणखी काळी कृत्ये, धक्कादायक खुलासा

श्रद्धा वालकरच्या फोनमध्ये आफताबची अनेक काळी कृत्ये दडल्याचे समोर आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shraddha Walker case Update : वसईच्या श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येच्या घटनेनं अख्खा देश हादरून गेलाय. तिचा मारेकरी आफताबची काळी कृत्ये रोज उघड होत आहेत. पोलीस  (Delhi Police) या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आणि आफताबला कठोरातील कठोर शिक्षा करण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहेत. पोलिसांच्या चौकशीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सध्या आरोपी आफताब हा पोलीस कोठडीत असून, त्याच्या नार्को चाचणीलाही कोर्टानं परवानगी दिली आहे. आता या हत्या प्रकरणात कोणती धक्कादायक माहिती समोर येतेय हे तपासाअंती कळेल. दरम्यान, श्रद्धा वालकरच्या फोनमध्ये आफताबची अनेक काळी कृत्ये दडल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाचा मित्र गॉडविनने याबाबत सांगितले की, श्रद्धाला खूप आधीच अफताबचा खरा चेहरा समजला होता. तो अंमली पदार्थांचे सेवन करायचा. याची माहिती श्रद्धाला समजल्यावर तिने तिच्या फोनमध्ये काही पुरावे गोळा केले होते. यात अफताब केव्हा अंमली पदार्थ घेत होता, तसेच तो कोणत्या व्यक्तींना ते पुरवत होता याची माहिती श्रद्धाने मिळवली होती. (Latest Marathi News)

गॉडविनने पुढे सांगितले की, २३ नोव्हेंबर २०२० रोजी त्या दोघांचे जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी श्रद्धाने आफताबचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तसे झाले नाही. तिने मझ्या भावाला कॉलवर सांगितले होते की, अफताब तिला खूप त्रास देत आहे. तो कधीही तिच्या जीवाचे बरेवाइट करेल असे ती आम्हाला सांगत होती. तिला आमच्या मदतीची तेव्हा गरज होती, असे गॉडविनने माध्यमांशी बोलताना सांगितले.

आफताबने १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली. त्याने तिच्या शरिराचे ३५ तुकडे केले आणि एकेक तुकडा तो जंगलात फेकत होता. १२ नोव्हेंबर रोजी या घटनेत आरोपी आफताबला शोधण्यात पोलिसांना यश आले.

आफताबनं बेदम मारहाण केली, हॉस्पिटलमध्ये होती श्रद्धा

श्रद्धाच्या हत्येच्या घटनेनं अवघा देश सुन्न झाला. या घटनेचा उलगडा हळूहळू होत आहे. श्रद्धाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताब तिला मारहाण करायचा. श्रद्धा आणि तिचा टीम लीडर यांच्यातील व्हॉट्सअॅप संवाद एका वृत्तवाहिनीच्या हाती लागला आहे. २४ नोव्हेंबरचं हे चॅट आहे. त्यात तब्येत ठीक नसल्याने श्रद्धाने सांगितले. आफताबनं तिला बेदम मारहाण केल्याचा उल्लेख त्यात आहे. अंथरूणातून उठताही येत नाही. मी काम करू शकत नाही. संपूर्ण अंग दुखत आहे, असे तिने चॅटमध्ये म्हटले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धाला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT