PM Modi Praised Sharad Pawar Saam TV
देश विदेश

Modi On Pawar: मोदींच्या भाषणात पवारांचं ५ मिनिटांत २ वेळा कौतुक, पहा काय म्हणाले मोदी?

PM Modi On Sharad Pawar: मोदींनी पवारांची केलेली स्तुती ही काही नवीन नाही. मात्र आजच्या भाषणात त्यांनी एकीकडे महाविकास आघाडी सरकारवर, खासकरुन कॉंग्रेसवर कडाडून टीका केली आहे, तर दुसरीकडे त्यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) आज राज्यसभेत कॉंग्रेसवर आक्रमक प्रहार केला आहे. त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका करत त्यांना नैराश्यातलं नेतृत्व म्हटलं आहे. सोबतच स्वतःच्या नैराश्याचा राग देशावर काढू नये असा टोलाही त्यांनी राहुल गांधींना लगावला आहे. मात्र, यावेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं कौतुक (Appreciation) करुन सगळ्यांनात आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे पवारांचं कौतुक करुन मोदींनी खेळी खेळली की, यामागे वेगळं काही गौडबंगाल आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. (In Modi's speech, Pawar was praised twice in 5 minutes, see what Modi said?)

हे देखील पहा

पंतप्रधान मोदी शरद पवारांचं कौतुक करत असताना म्हणाले की, वैयक्तिक नैराश्य राजकारणावर काढू नये असा टोला त्यांनी राहुल गांधींना लगावला. पुढे ते म्हणाले की, जनप्रतिनिधी छोटा असो किंवा मोठा असो त्याला त्याच्या क्षेत्रातले लोक फॉलो करतात. जर नेता नैराश्याने भरलेला असेल तर काय होईल? सत्तेत असल्यावरच देशाची चिंता करतात का? कुणाकडून नाही शिकत तर शरदरावांकडून शिका. मी बघितलं आहे की, शरदराव या वयातही अनेक व्याधी असतानाही आपल्या क्षेत्रातील लोकांना प्रेरणा देतात असं म्हणत मोदींनी पवारांचं कौतुक केलं आहे.

मोदींनी कॉंग्रेसला शरद पवारांकडून शिकण्याचा सल्ला दिल्यानंतर कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खगरे यांनी यावर आक्षेप घेतला. पुढे मोदी म्हणाले की, राजकारणात काही लोकांनी गेल्या दोन वर्षात अपरिपक्वता दाखवली आहे. भारतीय लसीकरणाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने टीका केली, कॉंग्रेसने कोरोना काळातल्या बैठकांवर बहिष्कार घातला पण, शरदरावांनी त्यावेळी सगळ्या बैठकांना हजेरी लावली. मी शरदरावांचे पुन्हा आभार मानतो. ते म्हणाले की, मी ज्यांना - ज्यांना बोलवू शकतो त्यांंना बोलवेल, हा यूपीएचा निर्णय नाही. शरद पवारांनी त्याकाळात आपले बहुमुल्य सल्लेही दिले असंही मोदी म्हणालेत.

मोदींनी पवारांची केलेली स्तुती ही काही नवीन नाही. मात्र आजच्या भाषणात त्यांनी एकीकडे महाविकास आघाडी सरकारवर, खासकरुन कॉंग्रेसवर कडाडून टीका केली आहे, तर दुसरीकडे त्यांनी पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. एकीकडे देशात पाच राज्यांत निवडणुकांचे बिगुल वाजले असताना राष्ट्रवादीही गोवा, यूपीत भाजपविरोधात लढणार असूनही मोदींनी केलेल्या पवारांच्या स्तुतीमागे नेमकं काय राजकारण (Politics) दडलंय हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT