Weather Update Today News  AI image
देश विदेश

Weather Update : पावसाचा जोर वाढणार! १० राज्यांना सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज काय? वाचा

Weather Update Today News : देशातील १० राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून जोरदार वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र थंडीची चाहूल

Alisha Khedekar

  • भारतीय हवामान विभागाने १८ नोव्हेंबर रोजी देशातील १० राज्यांना पावसाचा इशारा

  • काही भागांमध्ये ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज

  • पुढील सात तास काही भागांसाठी महत्त्वाचे

  • महाराष्ट्रात थंडीची चाहूल

एकीकडे देशात थंडीची चाहूल लागली असतानाच दुसरीकडे हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने १८ नोव्हेंबर रोजी देशातील १० राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, पावसासोबतच जोरदार वादळी वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात तास महत्त्वाचे असणार आहेत. या काळात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित राज्यांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, तमिळनाडू, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, बिहार आणि अंदमान-निकोबार या दहा राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. या राज्यांमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो.

महाराष्ट्रात थंडीचा कडाका

राज्यातील हवामानात सध्या बदल जाणवत असून, पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे. दिवसा उन्हाचा चटका, तर रात्री आणि पहाटे थंड वारे वाहत असल्याने नागरिकांना बदलत्या वातावरणाचा सामना करावा लागत आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान २८, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यातील आसखेड्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

Vande Bharat Train: पाहुण्यांना निरोप द्यायला गेले अन् ३६ हजारांचा दंड भरून आले! का बसला दंड? कुठे घडला हा प्रकार?

Plane Crash : हवेतच विमानाला आग, क्षणांत जमिनीवर कोसळून मोठा स्फोट; विमान दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

Quad क्वाड परिषदेतील PM मोदींच्या कृत्यानं जिंकली अनेकांची मने; VIDEO व्हायरल

Wednesday Horoscope : बोलताना संयम ठेवा! ५ राशींच्या व्यक्तींना कामाच्या नव्या संधी मिळतील; वाचा आजचे राशी

SCROLL FOR NEXT