IMD Weather Alert: Heavy Rain And Thunderstorm Warning For 11 States saam tv
देश विदेश

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

India Weather Alert: ईशान्य भारतात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येईल. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या राज्यांमधील काही भागांत मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • हवामान विभागाकडून ११ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट

  • ईशान्य भारतातील राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

  • अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात धुव्वाधार पाऊस होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तुवलीय. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, दक्षिण भारतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळच्या काही भागांतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलाय.

यासह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातही पावसाची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता आहे. मात्र रविवारी जोरदार वाऱ्यांबाबत कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. २३ नोव्हेंबरपासून तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असू शकतो, जो काही ठिकाणी झोक्यांसह ताशी ६० किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

ईशान्य भारतात अधिक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. या राज्यांतील काही भागांत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयातही मुसळधार पाऊस होऊ शकतो, तर अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांवरही पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भारतात, २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच २१ ते २७ नोव्हेंबर दरम्यान किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि केरळमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, ज्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हवामान

उत्तर प्रदेशमध्ये रविवारी हवामानातील सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे धुक्याची स्थिती असेल. हवामान विभागाने २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी पूर्व उत्तर प्रदेशमध्ये दाट धुक्याचा इशारा दिलाय. सकाळच्या वेळी दृश्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. वाहनचालकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यात पावसाबाबत कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.

तापमानात कोणताही लक्षणीय बदल अपेक्षित नाही. तसेच, २२ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये हवामानात कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने आगामी आठवड्यात बिहार किंवा उर्वरित पूर्व भारतात कोणत्याही महत्त्वपूर्ण हवामान घडामोडींचा अंदाज वर्तवलेला नाहीये.

दिल्लीमध्ये कसे हवामान

दिल्लीत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी बहुतेक भागांत धुरके किंवा हलके धुके असेल, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे धुके असू शकते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राजधानीतील कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये कोरडे हवामान

२२ नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यात पाऊस, वादळ किंवा गारपिटीबाबत कोणताही इशारा दिलेला नाही. आयएमडीनुसार, पुढील आठवड्यात पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात कोणतीही विशेष हवामान घडामोड घडण्याची शक्यता नाही. परिणामी, सध्या तरी राजस्थानमध्ये पावसाची कोणतीही शक्यता नाही.

हिमाचल प्रदेशात पाऊस किंवा बर्फवृष्टीबाबत कोणतीही विशेष चेतावणी देण्यात आलेली नाही. हवामान विभागाने पश्चिम, मध्य किंवा पूर्व भारतात कोणत्याही महत्त्वपूर्ण हवामान घडामोडींचा अंदाज वर्तवलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT