IIIT Student  Saam Tv
देश विदेश

IIIT च्या ५ विद्यार्थ्यांनी रचला इतिहास; बड्या कंपन्यांकडून १ कोटींपेक्षा जास्त पॅकेज

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था ने प्लेसमेंटमध्ये नवा विक्रम रचला आहे.

साम वृत्तसंथा

प्रयागराज: भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) ने प्लेसमेंटमध्ये नवा विक्रम रचला आहे. IIIT प्रयागराजच्या पाच विद्यार्थ्यांना एक कोटींपेक्षा अधिकच्या पॅकेजची ऑफर मिळाली आहे. या पाचपैकी प्रथम प्रकाश गुप्ता या विद्यार्थ्याला गुगलने (Google) १ कोटी ४० लाख रुपयांच्या सर्वाधिक पॅकेजची ऑफर दिली. यासह कॅम्पस प्लेसमेंटमध्ये या विद्यार्थ्यांनी सर्व विक्रम मोडीत काढले. प्रथमला गुगलने १.४ कोटी रुपये, बी. टेकचा विद्यार्थी अखिल सिंह याला रुब्रिकने १.२ कोटी रुपये, तर पलक मित्तल आणि अनुराग मकाडे याला अॅमेझॉनने १.२५ कोटी रुपयांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे.

एम. टेकचा विद्यार्थी प्रशांत याला अॅमेझॉनने (Amazon) १.२५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले. तसेच प्लेसमेंटमधील या विद्यार्थ्यांना फेसबुक, अॅपल, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स आणि गुगलसारख्या बड्या कंपन्यांकडून गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या दिल्या आहेत. या कॅम्पस सिलेक्शनमध्ये या वर्षी एमबीएमध्ये ७५ टक्के प्लेसमेंट घेण्यात आली आहे. सर्वाधिक पॅकेज ३५ लाखांचे आहे. या विद्यार्थ्यांना एअरटेल, इम्पॅक्ट गुरू, रुद्राक्षी टेक्नोलॉजीज, प्रायव्हेड लिमिटेड आणि यंगसारख्या कंपन्यांकडून मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या बॅचच्या या सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के प्लेसमेंट मिळाली आहे.

आयआयआयटीच्या बी. टेकमधून ३२८ विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट २०२१ मध्ये प्लेसमेंट देण्यास सुरुवात केली होती. त्यातील ४८ टक्के नोकऱ्या अॅमेझॉन, फेसबुक, नेटफ्लिक्स आणि अॅपल, गुगलसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये मिळाल्या आहेत. दुसरीकडे एम टेकच्या टीममधील १६१ विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यातील ९३.७५ टक्के विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे एम टेक आयटी स्ट्रीममध्ये पहिल्यांदाच १०० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे.

आयआयआयटीचे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के प्लेसमेंट मिळाली आहे. यावेळी देश-विदेशातील २२६ बड्या कंपन्या प्लेसमेंटसाठी संस्थेत आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT