कोरोनाची तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर... Dr. Randeep Guleriya
देश विदेश

कोरोनाची तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर...

देशात आजही अनेक ठिकाणी कोरोना बंधितांची संख्या जास्त आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : कोरोनाची (corona virus) तिसरी लाट (Third Wave) येऊ द्यायची नसेल तर देशातील नागरिकांनी सावधगिरी बाळगत कोरोना नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना नियमांचे (Covid Protocaol) पालन केले तरच भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (All India Institute of Medical Sciences) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randip Guleriya) यांनी दिली आहे.

"देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांनी आढेवेढे न घेता स्वतःचे लसीकरण करून घेतले तर तिसरी लाट येणार नाही किंवा तिची तीव्रता खूप कमी असेल. असेही यावेळी डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी दोन लसीच्या मिश्रणाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. दोन लसींच्या मिश्रणाबाबत बोलायचे झाल्यास याबाबत अधिक डेटा मिळणे आवश्यक आहे. अभ्यासातून असे समोर आले आहे की, दोन लसींचे मिश्रण प्रभावी ठरू शकते, परंतु त्याचे दुष्परिणामही जास्त असतील. त्यामुळे याबाबत अधिक डेटा मिळणे गरजेचे आहे. तसेच त्यासाठी प्रयत्नही कारायला हवेत.

देशात आजही अनेक ठिकाणी कोरोना बंधितांची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिक लक्ष द्यायला हवे. प्रकरणे कमी होत आहेत पण अशी काही क्षेत्रे आहेत जिथे सकारात्मक प्रकरणांची संख्या अजूनही जास्त आहे. आम्हाला त्या भागात आक्रमकपणे या समस्येवर लक्ष देण्याची गरज आहे. ते हॉटस्पॉट्स बनू नयेत आणि त्यांच्यामुळे इतर भागात व्हायरसचा प्रसार वाढू नये, याकडेही लक्ष देणे आमच्यासाठी आवश्यक आहे, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT