Mallikarjun Kharge Saam Tv
देश विदेश

Mallikarjun Kharge on Amit Shah: अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावरून मल्लिकार्जुन खरगे आक्रमक; केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी

Mallikarjun Kharge Targets Amit Shah: गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरून कोट्यवधी देशवासीय दुखावले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा - मल्लिकार्जुन खर्गे

Bhagyashree Kamble

अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य अपमानजनक आहे. त्यांनी आतापर्यंत राजीनामा द्यायला हवा होता, असा हल्लाबोल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर असेल तर, त्यांनी आज रात्री १२ पर्यंत अमित शहा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे.' अशी मागणीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेतील विधानावरून गदारोळ सुरूय. विरोधी पक्षांकडून आरोप होत आहेत. अशातच मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहांवर टीका केलीय. गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरून कोट्यवधी देशवासीय दुखावले गेले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. राज्यसभेत त्यांनी राज्यघटनेचा अपमान केलाय. जर भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडा जरी आदर असेल तर, अमित शहा यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी मल्लिकार्जुन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलीय.

पंतप्रधान मोदींनी अमित शहा यांना मंत्रिमंडळातून हटवावे

पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन यांनी अमित शहांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केलीय. 'बाबासाहेबांबद्दल कुणी चुकीचे बोलले तर, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवे होते. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा आणि जर पंतप्रधान मोदींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर असेल तर, त्यांनी आज रात्री १२ पर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, असे खरगे म्हणाले.

भाजपच्या नेत्यांचा संविधानावर विश्वास नाही. भाजप स्वर्ग - नरकाच्या गोष्टी करतात. मनुस्मृतीचीही चर्चा करतात. मनुस्मृतीमध्ये स्वर्ग नरक काय हे स्पष्ट लिहिले आहे आणि तीच मानसिकता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची आहे, असाही हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT