Tukaram Mundhe News  
देश विदेश

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Tukaram Mundhe News : पान-गुटख्याच्या जाहिरातीवरून तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटींना सुनावले. 'जाहिरात करत असाल तर आधी स्वतः खा आणि मुलांना खायला द्या', असे वक्तव्य त्यांनी केले.

Namdeo Kumbhar

Tukaram Mundhe News : दूध, पनीर आणि हॉटेल्समधील अन्नपदार्थांमधील भेसळीवर धडक कारवाई करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या कलाकारांकडे वळवला आहे. तंबाखू, पान-मसाला आणि गुटखा यांच्याशी साम्य असलेल्या इलायची ब्रँडची जाहिरात केल्याप्रकरणी एफडीएने अभिनेता शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. 'सरोगेट ॲडव्हर्टायझिंग' म्हणजेच अप्रत्यक्षपणे अंमली किंवा आरोग्याला घातक असलेल्या पदार्थांची प्रसिद्धी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

एफडीएच्या या कठोर भूमिकेमुळे आणि तुकाराम मुंढेंच्या थेट इशाऱ्यामुळे सध्या बॉलिवूड वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जर या अभिनेत्यांनी दिलेल्या नोटीशीला योग्य उत्तर दिले नाही किंवा नियमांचे उल्लंघन सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार राहू शकते, अशी चर्चा सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणावर एनडीटीव्हीशी बोलताना तुकाराम मुंढे संतापलेले पाहायला मिळाले. माझ्या नजरेत हे लोक सेलिब्रिटी किंवा स्टार नसून फक्त कायदा मोडणारे आहेत. कायद्यासमोर सगळे समान असून कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला. जर या कलाकारांना वाटत असेल की पान-मसाला किंवा गुटख्याची जाहिरात करणे चुकीचे नाही, तर त्यांनी हीच गोष्ट आधी स्वतःच्या मुलांना खायला द्यावी. समाजातील लाखो तरुणांवर या जाहिरातींचा वाईट प्रभाव पडतो, असे तुकाराम मुंढे म्हणाले.

एनडीटीव्ही (NDTV) च्या एका कार्यक्रमात बोलताना एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, "मला दुटप्पी लोकांचा खूप त्रास होतो." मला चापलुसी अजिबात आवडत नाही. मला दुटप्पीपणा आणि दुतोंडी वागणेही पटत नाही. आणि ते आवडण्याचे कारणही नाही, कारण मला अशा प्रकारचे चारित्र्यच मुळात पसंत नाही. तुम्ही जे काम करता, जे बोलता आणि जसे वागता, त्याबद्दल जर तुम्ही स्वतः प्रामाणिक नसाल, तर याचा अर्थ तुम्ही खरे माणूस नाहीच. तुम्ही दुसरीच कोणतीतरी व्यक्ती आहात... तुम्ही इथे एक चेहरा दाखवता आणि तिथे दुसराच चेहरा, असा संताप मुंढे यांनी व्यक्त केला.

तुम्ही ज्या गोष्टीची जाहिरात करत आहात ती जर खरोखरच चांगली असेल, तर आधी स्वत:पासून त्याची सुरुवात करा. जाहिरात करणाऱ्या व्यक्तीने ते उत्पादन स्वतःही वापरून पाहिले पाहिजे. तुम्ही लोकांना त्याचे अनुकरण करायला का सांगत आहात? सुरुवात स्वतःपासून करा. जर तुम्ही पान-गुटख्याची जाहिरात करत असाल, तर आधी स्वतः खाऊन बघा, मग तुमच्या मुलांना खायला द्या आणि त्यांनाही याची सवय लावा, असे ते म्हणाले.

तुम्ही त्यात केशर आहे असे सांगत आहे. तर मग ते तुम्हालाही खावेसे वाटायला हवे ना? मग नक्की खा! आधी तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला ते खायला सांगा आणि त्यानंतरच देशातील इतर लोकांना सांगा. नियमांचे उल्लंघन करून अशा जाहिराती करणे हे केवळ अनैतिकच नाही, तर पूर्णपणे बेकायदेशीरसुद्धा आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Famous Singer : प्रसिद्ध गायक झाला बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा, ५ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ

Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

Maharashtra News Live Update: शिरूर तालुक्यात रांजणगाव एमआयडीसीत गोळीबार

SCROLL FOR NEXT