IAS OFFICERS TRANSFERRED IN UTTAR PRADESH saam tv
देश विदेश

IAS Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे पोस्टिंग?

IAS OFFICERS TRANSFERRED IN UTTAR PRADESH: उत्तर प्रदेशमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Priya More
  • उत्तर प्रदेशमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरूच

  • मध्यरात्री १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या

  • अलीगढ आणि मुरादाबाद विभागीय आयुक्तांच्या बदल्यांची माहिती

  • बदल्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली

उत्तर प्रदेशमध्ये प्रशासकीय बदल्यांचा धडाका सुरू आहे. राज्य सरकारने रविवारी मध्यरात्री मोठा प्रशासकीय फेरबदल करत १७ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. अलीगड आणि मोरादाबादच्या विभागीय आयुक्तांची देखील बदली करण्यात आली आहे. अलीगढच्या विभागीय आयुक्त संगीता सिंह यांची मोरादाबादच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर प्रयागराजच्या महसूल परिषदेचे सदस्य ओम प्रकाश आर्य यांच्याकडे अलीगढच्या विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या यादीनुसार, अलीगढच्या विभागीय आयुक्त संगीता सिंह यांची मोरादाबादच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. प्रयागराजमध्ये महसूल परिषदेचे सदस्य असलेले ओम प्रकाश आर्य यांची अलीगढच्या विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली. ग्रामीण विकास आयुक्त आणि सचिव असलेले गौरी शंकर प्रियदर्शी यांची आयुषचे महासंचालक आणि राष्ट्रीय आयुष मिशनचे मिशन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. आयुषच्या महासंचालक आणि मिशन संचालक असलेल्या चैत्रा व्ही राजस्व यांची महसूल परिषद सदस्य पदी बदली करण्यात आली.

समाजकल्याण विभागाचे सचिव असलेले प्रमोद कुमार उपाध्याय यांची उत्तर प्रदेशच्या ग्रामीण विकास आयुक्तपदी बदली करण्यात आली. नगरविकास विभागाचे सचिव असलेले रवींद्र कुमार यांची उत्तर प्रदेश जल निगमच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले मासूम अली सरवर यांची उत्तर प्रदेश जल निगमच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

जल निगम ग्रामीणचे व्यवस्थापकीय संचालक असलेले डॉ. राज शेखर यांची नियोजन विभागाचे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. सहकारी संस्थांचे आयुक्त आणि निबंधक असलेले योगेश कुमार यांची जल निगम ग्रामीणचे व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आलीय उत्तर प्रदेश राज्य माहिती आयोगाचे सचिव असलेले कुमार प्रशांत यांची सहकारी संस्थांचे आयुक्त आणि निबंधक पदी निवड करण्यात आली. सचिवालय प्रशासन विभागाचे सचिव असलेले गुर्राला श्रीनिवासुलू यांची उत्तर प्रदेश राज्य माहिती आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतीक्षा यादीत असलेल्या आयएएस अमृत पाल कौर यांची उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखाने लिमिटेडच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. कृषी उत्पादन आयुक्त शाखेचे विशेष सचिव असलेले देवेंद्र कुमार पांडे यांची ग्राहक व्यवहार विभागात विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. लखनऊ विकास प्राधिकरणाचे सचिव असलेले विवेक श्रीवास्तव यांची पशुसंवर्धन विभागात विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. उच्च शिक्षण विभागाचे सचिव असलेले अमृत त्रिपाठी यांची प्रयागराज महसूल परिषदेचे सदस्य (न्यायिक) म्हणून निवड करण्यात आली. महसूल परिषदेचे सदस्य असलेले ओम प्रकाश राय यांची उच्च शिक्षण विभागात विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय, उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखानेचे सहव्यवस्थापकीय संचालक असलेले नवनीत सेहरा यांना अद्याप कोणतेही पद देण्यात आलेले नाही. सध्या त्यांना उत्तर प्रदेश सहकारी साखर कारखाने लिमिटेडच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने याआधी गुरूवारी रात्री उशिरा ९ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली होती. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आता मी जास्त काम करु शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला हवी'; गडकरींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

हॉटेल स्टाइल फरफरीत भात बनवण्यासाठी तांदूळ किती वेळा धुवावे? पाणी किती असावं, जाणून घ्या जबरदस्त पद्धत

Ideal Weight by Age: तुमचं वजन योग्य आहे का? १८ ते ६० वयापर्यंत वयानुसार जाणून घ्या किती असावे वजन

Maharashtra News Live Update: गणेश मंडळ आणि महापालिकेच्या बैठकीत गोंधळ

Skin Care : सणांच्या घाईत त्वचेसोबत 'ही' चूक होत नाही ना? नॅचरल ग्लो हवा असेल, तर आजपासूनच करा हे ५ बदल

SCROLL FOR NEXT