Narendra Modi Latest Marathi News, PM Modi in Japan
Narendra Modi Latest Marathi News, PM Modi in Japan  Saam TV
देश विदेश

मैं मक्खन पर नहीं, पत्थर पर लकीर खींचता हूं : PM नरेंद्र मोदी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) क्वाड परिषदेत (Quad Summit) सहभागी होण्यासाठी दोन दिवासाच्या जपान दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज जपानमधील अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "भारतात सध्या खऱ्या अर्थाने जनतेची कामं करणार सरकार आहे. तसचं भारत नव्याने विश्वास संपादीत करत आहे आणि हेच लोकशाहीवरील विश्वासाचं मोठं कारण असल्याचं ते म्हणाले. शिवाय भारताला आपल्या भुतकाळाबाबत जेवढा अभिमान आहे, तेवढीच भविष्यकाळाबाबात आशा असल्याचं मोदी म्हणाले शिवाय 'मैं मक्खन पर नहीं, पत्थर पर लकीर खींचता हूं' असंही ते यावेळी म्हणाले. (Narendra Modi Latest Marathi News)

ते पुढे म्हणाले, भारत ज्या गतीने पायाभूत सुविधा आणि क्षमता वाढवत आहे ती क्षमता वाढवण्यासाठी जपान हा महत्त्वाचा भागीदार असल्याचं जगाला कळतं आहे. भारतातील मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हे भारत-जपान सहकार्याची उत्तम उदाहरण असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हे देखील पाहा -

गौतम बुद्धांचा (Gautama Buddha) आशीर्वाद मिळाला यासाठी भारत भाग्यवान असून, कितीही मोठे आव्हान आलं तरीही भारत मानवतेची सेवा करत राहीला आहे. भारत संकटावरती उपाय शोधून काढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची आजच्या जगाला खूप गरज आहे. आज जगासमोरील सर्व आव्हानांपासून मानवतेला वाचवण्याचा हाच मार्ग आहे, मग तो हिंसाचार, अराजकता, दहशतवाद किंवा हवामान बदल असो असही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, मागील १०० वर्षातील सर्वात मोठं संकट असणाऱ्या कोरोना (Corona) काळात भारताने जगभरातील लोकांना मदत केली. जेव्हा लस उपलब्ध झाली तेव्हा भारताने आपल्या करोडो नागरिकांना 'मेड इन इंडिया' लसींचा पुरवठा केला, शिवाय जगातील १०० हून अधिक देशांमध्ये लसी पाठवल्याचंही मोदी यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT