Hyderabad Crime News Saam TV
देश विदेश

Hyderabad Crime News: ऑफिसमध्ये सर्वांसमोर अंगावर पेट्रोल ओतून लावली आग; पत्नीने केला पतीच्या आत्महत्येचा धक्कादायक खुलासा

Man Self Immolation: या व्यक्तीचा पगार गेल्या काही महिन्यांपासून देण्यात आला नव्हता.

Ruchika Jadhav

Hyderabad News:

हैदराबादमधून काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसमोर आत्महत्या केली आहे. त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन केलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या व्यक्तीचा पगार गेल्या काही महिन्यांपासून देण्यात आला नव्हता त्या रागातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. (Latest Marathi News)

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविंद्र असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ३६ वर्षीय रविंद्र ट्रॅफिक पोलिस स्टेशनला काम करत होता. पगार न मिळाल्याने त्याने अंगावर पेट्रोल ओतलं आणि स्वत:ला जाळून घेतलं. ही घटना घडली त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. काहींनी पुढे येत रविंद्रला आगीच्या कचाट्यातून बाहेर खेचलं.

तसेच त्याला तातडीने रुग्णालात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली आहे. रविंद्र त्या दिवशी गोशामहल पोलिस स्टेडियमजवळ असलेल्या कमांडंट होमगार्डच्या कार्यालयात पगार मिळण्याची वाट पाहत होता.

रविंद्रची पत्नी संध्याने या घटनेनंतर सहाय्यक उपनिरीक्षक आणि कमांडंट ऑफिसमधील कॉन्स्टेबलवर आरोप केलेत. पगार वेळेत न दिल्याने आणि चुकीची वागणूक दिल्याने माझ्या पतीने आत्महत्येचं पाउल उचललं असं पत्नीने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT