hyderabad Crime News Saam Tv
देश विदेश

Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेयसीला मेसेज केल्याने चिरला मित्राचा गळा, हृदय बाहेर काढलं अन्...

या भयंकर आणि भीषण हत्याकांडाचा घटनाक्रम काळजाचा थरकाप उडवणारा आहे...

Gangappa Pujari

Hydrabad: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात भीषण हत्याकांडाच्या घटना घडताना दिसत आहेत. दिल्लीमधील श्रध्दा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. ही घटना चर्चेत असतानाच हैद्राबादमध्येही (Hydebarabad) अशीच एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

प्रेयसीसोबत बोलल्याच्या रागातून एका तरुणाने मित्राचीच गळा चिरुन हत्या केली. त्याचे पोट फाडून ह्रदय बाहेर काढल, इतकेच नव्हेतर त्याचे गुप्तांगही कापले. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. (Latest Marathi News Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, ही संपूर्ण १७ फेब्रूवारी रोजी घडली आहे. कृष्णा (वय, २२) आणि नवीन (वय, २१) हे दोघे मित्र होते. नवीन कॉलेजमध्ये असताना एका मुलीच्या प्रेमात पडला. पण दोन वर्षातच त्यांच्यात भांडण झालं व दोघांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर ती मुलगी आणि कृष्णा यांच्यात जवळीक वाढली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. याबद्दल नवीनला समजले.

यानंतर तो त्या मुलीला मेसेज करु लागला. फोन करुन त्रास देवू लागला. काही दिवसांनी मुलीने याबद्दलची माहिती कृष्णाला सांगितली, ज्यानंतर कृष्णाने नवीनचा काटा काढण्याचे ठरवले.

१७ फेब्रूवारीला केली हत्या..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारीला आरोपी कृष्णाने नवीनला गेट-टुगेदरच्या बहाण्याने बोलावून घेतले. दिलसुखनगर येथील कृष्णाच्या घरी भेट झाल्यानंतर शहरात फिरण्यासाठी म्हणून दोघे बाहेर पडले. संध्याकाळी नवीनने कृष्णाला त्याला कॉलेज हॉस्टेलवर सोडण्यास सांगितले. कृष्णा त्याला हॉस्टेलवर सोडण्याच्या बहाण्याने पेड्डा अंबरपेठ येथील वस्तीत घेऊन गेला.

यावेळी रस्त्यात कृष्णा दारु प्यायला तसेच त्याने सूरा विकत घेतला. यावेळी दोघांमघ्ये जोरदार वाद झाला. याच वादातून कृष्णाने दोरीने गळा आवळून नवीनची हत्या केली. कृष्णाने त्यानंतर नवीनचा गळा चिरला केला. त्याचं पोट फाडून ह्दय बाहेर काढलं. हाताची बोटं, गुप्तांग कापले. त्यानंतर बाईक घेऊन निघून गेला. त्यानंतर कृष्णाने स्वतः पोलिसांसमोर या हत्येची कबूली दिली. पोलिसांनी आरोपीच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT