नवी दिल्ली : एखादा व्यक्ती सरकारी नोकरीत कोणत्याही पदावरही असला तरी त्याचं कौतुक होतंच. घरातील एखादा व्यक्तीही सरकारी नोकरीवर असला तरी लोक मोठ्या अभिमानाने सांगत असतात. मात्र, याच सरकारी नोकरीमुळे नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा आल्याची घटना घडली आहे. या दोघांमधील दुराव्याचं कारण एक सरकारी नोकरी ठरली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सरकारी नोकरी मिळाल्यानंतर विवाहित महिला थेट माहेरी राहायला गेली. सरकारी नोकरी मिळाल्याने कायमची माहेरी राहण्यासाठी जात असल्याचे महिलेने सांगितले. मनाला वाटेल तेव्हा नवऱ्याला भेटायला येईल. तसेच यावेळी सरकारी नोकरी लागलेल्या बायकोने सासरी राहण्यासाठी १ कोटींची मागणी केली.
उत्तर प्रदेशच्या नौबस्ताच्या हंसपुरमा येथे ही घटना घडली आहे. खासगी शाळेचा मॅनेजर बजरंगने २२ फेब्रवारी २०२३ रोजी साहिबाबाद येथे राहणाऱ्या लक्षितासोबत लग्न केलं. मिळालेल्या माहितीनुसार, लक्षिता ही दिल्लीत सरकारी शिक्षिका म्हणून रूजू झाली. त्यानंतर बजरंगच्या घरातील मंडळी तिला सासरी नेण्यासाठी आले. मात्र, तिने नकार दिला. माहेरी राहून नोकरी करणार असल्याचे तिने सांगितले. तसेच मनाला वाटेल, तेव्हा सासरी येईल, असेही तिने सांगितले.
'माझ्या मागणीला विरोध केल्यास खोट्या केसमध्ये अडकवेन, अशी धमकी दिल्याचा बजरंगच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. बायको काही कारण नसताना माहेरी गेली आहे. १२ डिसेंबर रोजी लक्षिताने तिच्या घरातील लोकांच्या साथीने शाळेत येऊन धमकी दिल्या, असा आरोपही बजरंगने केला आहे. तसेच बायकोने १ कोटी रुपये मागितल्याचाही बजरंगचा आरोप आहे.
दरम्यान, किदवईनगरमध्ये असाच प्रकार घडला. नवरा सरकारी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्यानंतर त्याने बायकोला त्रास देण्यास सुरुवात केली. नवऱ्याने बायकोकडे २५ लाख रुपये आणि महागड्या कारसाठी तगादा लावला. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून बायकोने पोलिसांत धाव घेतली. तिने पोलिसांत सासरच्या मंडळीविरोधात तक्रार नोंदवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.