Crime News Saam tv
देश विदेश

Crime News: पत्नीचं अफेअर, बॉयफ्रेंडला लपून छपून भेटायची; नवऱ्याला कळताच दोघांचा काटा काढला

Crime News: पत्नीच्या चालू असलेल्या प्रेम प्रकरणावरून पतीनं पत्नी आणि तिच्या प्रियकराची धारदार चाकूनं हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Bhagyashree Kamble

पत्नीच्या चालू असलेल्या प्रेम प्रकरणावरून पतीनं पत्नी आणि तिच्या प्रियकराची धारदार चाकूनं हत्या केलीय. ही धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडलीय. पत्नीचे एका व्यक्तीसोबत अफेअर चालू होते. पतीला याची माहिती मिळताच त्यानं आधी पत्नीच्या प्रियकराचा आणि नंतर प्रियकाराला वाचवायला येणार्‍या पत्नीचा धारदार चाकूनं वार करत ठार केलंय. या प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत.

राजस्थानच्या धाकडखेडी गावात गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांडाची घटना घडलीय. पतीने पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराचा खून केलाय. याप्रकरणी बारानचे पोलीस अधीक्षक राज कुमार चौधरी सांगतात, आरोपी गणेश मेवाड याचं १२ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना २ मुले आहेत. एक वर्षापासून पत्नी रिंकीचे कोटा येथील गौरव हाडासोबत प्रेमसंबंध होते.

गौरवचे धाकडखेडी गावात नातेवाईक होते. त्यामुळे तो वारंवार ये जा करत होता. ज्यामुळे रिंकी आणि गौरव यांची भेट कायम होत राहायची. नंतर दोघांमधील प्रेमसंबंध वाढत गेले. कधी गौरव धाकडखेडी गावात यायचा तर, कधी रिंकी गौरवला भेटण्यासाठी कोटा जात असे. काही दिवसानंतर गौरवनं गणेशला रिंकीला सोबत घेऊन जाणार अशी धमकी दिली.

यामुळे गणेशचा रागाचा पारा वाढत गेला. १ जानेवारीला गौरवनं गणेशला कॉल केला आणि रिंकीला घेऊन जाणार असल्याचं त्यानं सांगितलं. तो येणार हे निश्चत होतं. त्यामुळे गणेशनं गौरवच्या हत्येचा प्लॅन आखला होता. त्याच प्लॅननूसार गणेशनं सोबत एक धारदार चाकू सोबत ठेवला. गौरव त्या रात्री आपल्या तीन मित्रांसोबत धाकडखेडी गावात गेला. मित्रांना गौरवनं गावाबाहेर थांबायला सांगितलं.

गौरव जसा घरात शिरला, गणेशनं चाकू काढत गौरवच्या डोक्यावर वार केला. धारदार चाकूचा वार इतका जोरात बसला की गौरव बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर रिंकी गौरवला वाचवण्यासाठी पळत गेली, तेव्हा गणेशनं आपल्या पत्नीच्या शरीर आणि मानेवर वार करत हत्या केली. २ जानेवारीला पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यांनी तातडीनं गणेश यांचं घर गाठलं. रिंकी आणि गौरवला पोलिसांनी रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी पती गणेशविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT